Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्राचार्य शंकरराव अनारसे यांचे  शब्दवैभव पुस्तक संस्कारशील

साहित्यिक द.सा. रसाळगुरुजी यांचे मत

श्रीरामपूर ः रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त प्राचार्य शंकरराव अनारसे यांनी शैक्षणिक अनुभवावर आधारित’ शब्दवैभव’ हे लिहिलेले पुस्तक आजच्या शिक्षण

विश्वस्त पदाच्या माध्यमातून भाविकांची सेवा करण्याची संधी – सौरभ बोरा
काँग्रेसचे मुक्कामी आंदोलन आश्‍वासनानंतर स्थगित ; आंदोलकांवर गुन्हा दाखल, मनपा ऑक्सिजन बेड सुविधा करणार
ओबीसींचा प्रश्न निकाली काढा, अन्यथा परिणाम भोगायला तयार रहा.. चिंतन बैठकीत इशारा l Lok News24

श्रीरामपूर ः रयत शिक्षण संस्थेचे सेवानिवृत्त प्राचार्य शंकरराव अनारसे यांनी शैक्षणिक अनुभवावर आधारित’ शब्दवैभव’ हे लिहिलेले पुस्तक आजच्या शिक्षण क्षेत्राला दिशादर्शक ठरणारे संस्कारशील पुस्तक असल्याचे मत संगमनेर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक, साहित्यिक दत्तात्रय सावळेराम       रसाळगुरुजी यांनी व्यक्त केले.
   इंदिरानगर येथील ग्रंथा वाचनालयात आयोजित ’शब्दवैभव’: एक शैक्षणिक चिंतन विषयावर परिसंवादात रसाळगुरुजी बोलत होते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. प्राचार्य अनारसे हे87 वर्षाचे आहेत तर मुख्याध्यापक रसाळगुरुगी हे88 वर्षाचे आहेत. दोघांचे शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रातील योगदान मोठे आहे. प्राचार्य अनारसे यांचे’ माळावरची माती’ आणि रसाळ गुरूजी यांचे’ घडता घडता’ ही आत्मचरित्रे त्यांच्या जीवनसंघर्षाचे महाभारत आहे, त्यामुळेच त्यांचे साहित्यचिंतन अनुभवांचे दीपस्तंभ आहेत, असे डॉ. उपाध्ये यांनी सांगितले.           रसाळगुरुजी यांनी प्राचार्य अनारसे यांच्या सहवासाच्या आठवणी विसद केल्या. ते एक ज्ञानतपस्वी व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगून शब्दवैभव हे त्यांचे पुस्तक अनुभव वैभव असल्याचे मत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, डॉ. शिवाजी काळे, भारत गवळी, कवयित्री संगीता फासाटे, सौ. मंदाकिनी उपाध्ये, प्रा.सौ.पल्लवी सैंदोरे यांनी परिसंवादात भाग घेतला. प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे यांनी परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्यावर रसाळगुरुजी यांनी लिहिलेल्या कवितेचे कौतुक केले. शब्दवैभव पुस्तकाचे मौलिकत्व पटवून दिले. . रसाळगुरूजी यांनी स्वाध्याय परिवाराचे कार्य संगमनेर येथे याही वयात जोमाने सुरू ठेवल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अशोकराव कटारे यांनी रसाळगुरूजी यांच्या चित्रकला व     लेखनकलेविषयी चा आनंद व्यक्त केला. संगीता फासाटे/ कटारे यांनी सूत्रसंचालन . केले. गणेशानंद उपाध्ये व सौ. आरती उपाध्ये यांनी नियोजन केले तर प्रा.सौ.पल्लवी नंदकुमार सैंदोरे यांनी आभार मानले.

COMMENTS