Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावमध्ये नरेंद्रचार्य महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा

कोपरगाव ः हिंदू धर्माचे धर्मगुरू अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांचा भव्य पादुका दर्शन सोहळा बुधवार 22 न

अहमदनगरच्या नरेंद्र कुदळेची राष्ट्रीय पातळीवर निवड
*LokNews24! देशात कोरोनापाठोपाठ ब्लॅक फंगसचा कहर
सर्व सोयींयुक्त उपजिल्हा रुग्णालय घुलेवाडीत लवकरच कार्यान्वित होणार -नामदार थोरात

कोपरगाव ः हिंदू धर्माचे धर्मगुरू अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांचा भव्य पादुका दर्शन सोहळा बुधवार 22 नोव्हेंबर रोजी सकाळी ठिक 10 वाजता येवला नाका नगर मनमाड हायवे, कोपरगाव उत्तर अ नगर.येथे आयोजित केला आहे.
या कार्यक्रमासाठी भव्य मंडपाची उभारणी केली असून कार्यक्रमाची जय्यत तयारी पूर्ण झाली असुन श्रींचे पादुकांचे आगमन., सामाजिक उपक्रम, गुरुपूजन, आरती सोहळा, प्रवचन, उपासक दिक्षा, दर्शन, पुष्पवृष्टी नंतर संपूर्ण महाराष्ट्रातून येणार्‍या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन ही करण्यात आले आहे. हा कार्यक्रम भव्य दिव्य होण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांचा सर्व भक्त परिवार मेहनत घेत आहे. उत्कृष्ट नियोजन शिस्तबद्ध प्रचार, प्रसार सुरू असून या कार्यक्रमाचा उद्देश जगद्गुरु माऊलींनी सांगितल्याप्रमाणे अध्यात्म, विज्ञान, व्यवहार यांची  सांगड घालून मनुष्याने आनंदी जीवन कसे जगावे तसेच जड मुढांचा उद्धार व्हावा. सध्याच्या कलियुगात भरकटलेल्या या प्रत्येक जीवाला मनशांती मिळण्यासाठी या कार्यक्रमाचा लाभ होणार आहे. कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो भक्त उपस्थित राहणार आहे. तरी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. अशी विनंती जिल्हा सेवा समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

COMMENTS