अरे बापरे…मनपा अधिकार्‍यांनी विकला मनपाचाच भूख़ंड? ; सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा दावा, आयुक्तांकडून चौकशीची ग्वाही

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अरे बापरे…मनपा अधिकार्‍यांनी विकला मनपाचाच भूख़ंड? ; सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा दावा, आयुक्तांकडून चौकशीची ग्वाही

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर महापालिकेत कधी काय होईल, हे सांगता येत नाही. मनपाच्या अधिकार्‍यांनी चक्क मनपाच्या मालकीचा भूखंड खासगी बांधकाम व्यावसायिकास वि

रेल्वे हमाल-माथाडींच्या मेळाव्यात एकजुटीतून संघर्षाचा नारा
इंटरनॅशनल आयडॉल अवॉर्ड- २०२१ मिळाल्याबद्दल ना. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते चित्रकार राहूल भालेराव यांचा सत्कार
तुमचे आजचे राशीचक्र मंगळवार, २९ जून २०२१ l पहा LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर महापालिकेत कधी काय होईल, हे सांगता येत नाही. मनपाच्या अधिकार्‍यांनी चक्क मनपाच्या मालकीचा भूखंड खासगी बांधकाम व्यावसायिकास विकल्याचा दावा मनपातील सत्ताधारी राष्ट्रवादीचे नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनीच केला आहे. याबाबत त्यांनी आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे तक्रार केली असून, त्यांनी याप्रकरणी चौकशीची ग्वाही दिली आहे.

महापालिकेच्या अधिकार्‍यांनी बोल्हेगाव येथील मनपाच्या हक्काचा भूखंड विकला असला तरी या जागेतील मंदिराची व सांस्कृतिक भवनाची एक वीटही काढू देणार नाही, असा इशाराही नगरसेवक वाकळे यांनी दिला आहे. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, सावेडीच्या बोल्हेगाव प्रभाग क्रमांक 7 या भागातील साईराज उपनगर मधील सर्वेनंबर 68/1/3/4 क्षेत्रामधील 44 गुंठ्यात महापालिकेचा हक्काचा ओपन स्पेस असताना महापालिकेतील अधिकार्‍यांनी बांधकाम व्यावसायिकाशी हातमिळवणी करून या ओपन स्पेसचा रिवाईज प्लॅन तयार करून मंजुरी घेतली आहे व हा भूखंड महापालिका अधिकार्‍याने त्या बांधकाम व्यावसायिकाला विकून टाकला, असा दावाही वाकळे यांनी केला. या भागातील रहिवाशांच्या हक्काचा हा ओपन स्पेस असताना या अधिकार्‍याने महापालिकेच्या हक्काच्या जागेत मोठा भ्रष्टाचार केला आहे. या ओपन स्पेसमध्ये मनपाने अधिकृतपणे सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. या ठिकाणी भव्य असे सांस्कृतिक भवन उभे आहे. असे असताना आता हा ओपन स्पेस अनधिकृत कसा झाला, असा सवाल करून ते म्हणाले, या ठिकाणी नागरिकांच्या हक्काचा ओपन स्पेस असल्यामुळे दहा-पंधरा वर्षापूर्वी दत्त मंदिर,श्रीभगवान बाबा मंदिर,श्रीसंत वामन बाबा मंदिर, गणेश मंदिर,विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व संतराम नागरगोजे सांस्कृतिक भवन या ठिकाणी उभे आहे. बांधकाम व्यावसायिकांनी महापालिकेच्या अधिकार्‍यांना हाताशी धरून या जागेचा रिवाईज प्लॅन मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे हे बांधकाम व्यावसायिक नागरिकांना धमकावत आहेत, या ठिकाणी उभी असलेली मंदिरे व सांस्कृतिक भवन पाडण्यात येणार आहे, असे त्यांच्याकडून सांगितले जात आहे. या ठिकाणी मोठी दाट लोकवस्ती आहे. या भागातील नागरिकांच्या हक्काचा ओपन स्पेस आहे, ही मंदिरे पाडल्यास नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील व येथे मोठा अनुचित प्रकार घडू शकतो. त्यामुळे मनपाने या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून मनपाच्या व नागरिकांच्या हक्काचा ओपन स्पेस लुबाडला जाऊ देऊ नये. या भागातील मंदिरांच्या व सांस्कृतिक भवनाच्या एकाही विटेला हात लावून देणार नाही. पण, जर असे झाले तर येथे कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन त्याला जबाबदार राहील असा इशारा नगरसेवक वाकळे यांनी आयुक्त गोरे यांना दिला. यावेळी भीमसेन कोणते, शेषराव बडे, मोहन पडोळे, गोरख खाडे,गहिरीनाथ बडे, मुरलीधर सुळे,ज्ञानदेव जायभाये,नंदाताई आंधळे,सविता अडसूळ,अनिता सोनवणे,संध्या दिवटे,मनीष नाकडे, संगीता खाडे,कल्पना गुंजाळ, स्वाती काळे, साधना लोंढे, लंका दौंड,प्रमिला गोर्डे, निर्मला चत्तर, उत्तमराव आडसूळ आदी नागरिक उपस्थित होते.

COMMENTS