Homeताज्या बातम्या

पिसाळलेल्या कुत्र्याचा १५ नागरिकांना चावा, एकाचा दुर्दैवी मृत्यू; राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथील घटना

देवळाली प्रवरा: राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक दहशत माजवत १५ हून अधिक नागरिकांना चावा घेतला. या हल्ल्यात दुकान

संजीवनी सैनिकी स्कूलचा साई बोळीज दहावीत प्रथम; १०० टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम
बाबासाहेब कवाद निघोज पतसंस्थेला साडेसहा कोटींचा नफा; सभासदांना १२ टक्के लाभांश : वसंत कवाद
प्रत्येक प्रश्नाला न्याय देण्याच्या भूमिकेतून काम करा : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश; पारनेरमध्ये टंचाई आढावा बैठक

देवळाली प्रवरा: राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक दहशत माजवत १५ हून अधिक नागरिकांना चावा घेतला. या हल्ल्यात दुकानाजवळ झोपलेल्या ७० वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एकाच वेळी अनेक नागरिकांना कुत्र्याने लक्ष्य केल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

साहेबराव राघुजी वाघमारे (वय ७०, रा. चिंचोली फाटा) असे मृत झालेल्या वृद्धाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरासमोरील दुकानाजवळ झोपलेले असताना पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावर अचानक जीवघेणा हल्ला केला. साहेबराव वाघमारे यांना चावा घेतल्यानंतर या कुत्र्याने परिसरातील आणखी १५ जणांवर हल्ला करत त्यांना जखमी केले.

घटनेची माहिती मिळताच ‘जीवनदायी ॲम्ब्युलन्स’चे निखिल भोसले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी साहेबराव वाघमारे यांना राहुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या इतर नागरिकांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू असून, काही जणांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

या भीषण घटनेनंतर सरपंच सुरेश उर्फ बंटी लाटे, आरोग्य विभाग, पशुवैद्यकीय विभाग, पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या या पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. चिंचोली फाटा परिसरात भीतीचे सावट पसरले असून, भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने कडक व प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी तीव्र मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

COMMENTS