Homeताज्या बातम्या

बाबासाहेब कवाद निघोज पतसंस्थेला साडेसहा कोटींचा नफा; सभासदांना १२ टक्के लाभांश : वसंत कवाद

निघोज : बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेला आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ६ कोटी ५० लाख रुपयांचा नफा झाला असून, सभासदांना १२ टक्के लाभांश दे

श्रीगोंदा पोलिसांची ‘अकस्मात मृत्यू निर्गती मोहीम’ यशस्वी; १५ दिवसांत १४६ प्रलंबित प्रकरणांचा निपटारा
स्वतःविरुद्धच गुन्हा दाखल करा! उपविभागीय अधिकार्‍यांचे थेट किनवट तहसीलदारांना पत्र; प्रशासकीय वर्तुळात प्रचंड संभ्रम
सौ. के. एस. के. महाविद्यालयात ‘पाऊस गाणी’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांच्या बहारदार सादरीकरणाने सभागृह दुमदुमले

निघोज : बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेला आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ६ कोटी ५० लाख रुपयांचा नफा झाला असून, सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याची घोषणा संस्थेचे अध्यक्ष वसंत बाबासाहेब कवाद यांनी केली. संस्थेच्या ठेवींनी ३१२ कोटी ६४ लाख रुपयांचा टप्पा गाठला असून, संस्थेची आर्थिक स्थिती अत्यंत भक्कम असल्याचे कवाद यांनी स्पष्ट केले.

संस्थेची २९वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. २) निघोज येथील पुष्कर लॉन्स येथे अध्यक्ष वसंत कवाद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या प्रारंभी जी. एस. महानगर बँकेचे उपाध्यक्ष भास्करशेठ कवाद आणि संस्थेचे उपाध्यक्ष नामदेव थोरात यांच्या हस्ते लक्ष्मीमाता व स्वर्गीय बाबासाहेब कवाद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय लंके यांनी मागील वार्षिक सभेचे इतिवृत्त वाचले. त्यानंतर अजेंड्यावरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. अध्यक्ष वसंत कवाद यांनी ३१ मार्च २०२६ अखेरचा ताळेबंद, नफा-तोटा अहवाल व नफावाटपाचा आढावा सभेसमोर मांडला. संस्थेच्या ३१ जुलै २०२६ अखेर ३१२ कोटी ६४ लाख रुपये ठेवी, २३१ कोटी ५१ लाख रुपयांचे कर्जवाटप, १४७ कोटी ३१ लाख रुपयांची गुंतवणूक, ५ कोटी ३८ लाख रुपयांची मालमत्ता आणि ४४ कोटी ७३ लाख रुपयांचा निधी असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब लामखडे व शांताराम कळसकर यांनी केले, तर मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय लंके यांनी आभार मानले.

COMMENTS