Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जालन्यात सदावर्ते यांच्या वाहनावर शाईफेक; मनसे कार्यकर्ते आक्रमक

जालना : वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केल्याची घटना जालन्यात घडली. शहरातील विशाल कॉर

आमदार साटम यांना मनसेने दाखवले काळे झेंडे
नीट, राम मंदिर देणगी प्रकरणावरून संसदेत गोंधळ
पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी गुन्हा दाखलनोएडातील तरूणीविरूद्ध गुन्ह ; जंतर-मंतरवरील घोषणाबाजी प्रकरण
Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर सुपाऱ्या आणि शाईफेक;  जालन्यात राजकीय वातावरण तापले | Navarashtra

जालना : वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केल्याची घटना जालन्यात घडली. शहरातील विशाल कॉर्नर परिसरात झालेल्या या प्रकारात काही कार्यकर्त्यांनी सुपार्‍याही फेकल्याचे सांगितले जात आहे. राज ठाकरे यांच्यावरील टीकेच्या निषेधार्थ ही कृती करण्यात आल्याचे समोर आले आहे.
माहितीनुसार, गुणरत्न सदावर्ते जालन्यात आले असताना त्यांच्या वाहनाला मनसे कार्यकर्त्यांनी घेराव घातला. जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी वाहनावर शाईफेक केली. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून संबंधित कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतरही परिसरात काही काळ घोषणाबाजी सुरू होती. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या काही दिवसांपासून गुणरत्न सदावर्ते आणि मनसे यांच्यातील वाद चर्चेत आहे. महिला आरक्षण, मतदारसंघ पुनर्रचना तसेच विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवरून सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. अनुसूचित जाती-जमाती, इतर मागासवर्गीय समाज आणि संविधानाबाबत राज ठाकरे यांची भूमिका चुकीची असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. याशिवाय, मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावरूनही सदावर्ते यांनी सरकार आणि मनसेच्या भूमिकेवर आक्षेप घेतला होता. त्या पार्श्‍वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. जालन्यातील शाईफेकीची घटना ही त्याच नाराजीचे पडसाद असल्याचे मानले जात आहे.

COMMENTS