Homeताज्या बातम्या

वृद्ध छळ-प्रतिबंधक जागृती दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम

अकोले : जागतिक वृद्ध छळ-प्रतिबंधक जागृती दिनानिमित्त हेल्पएज इंडिया आणि श्रीमती मणीबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ज्

आनंदगड तंत्रनिकेतनला प्रवेश सुविधा केंद्राची (FC) मान्यता; तालुक्यातील विद्यार्थ्यांना पदविका अभियांत्रिकी प्रवेशासाठी दिलासा
“अवैध दारू व गुटखा विक्री रोखण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घ्यावा” – हेरंब कुलकर्णी यांचे आवाहन; आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या भूमिकेचे स्वागत
कर्जमाफी शासन आदेशाची अकोलेत होळी; किसान सभेचे राज्यव्यापी आंदोलन


अकोले : जागतिक वृद्ध छळ-प्रतिबंधक जागृती दिनानिमित्त हेल्पएज इंडिया आणि श्रीमती मणीबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षण, सन्मान आणि स्वावलंबनाबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हवामान बदलाच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी शासन, सामाजिक संस्था आणि समाजाने समन्वयाने काम करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.
महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रार्थना गीताने झाली. हेल्पएज इंडियाचे सहसंचालक राम नाईक यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी ‘हवामान बदलाचा सामना करण्यास सक्षम वृद्धत्व : काळजी, प्रतिष्ठा आणि स्वावलंबन सुनिश्चित करणे’ या विषयावरील राष्ट्रीय अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
हेल्पएज इंडियाचे महाराष्ट्र व गोवा विभागाचे कार्यक्रम सहसंचालक व्हॅलेरियन पेस यांनी अहवालाचे सादरीकरण करताना उष्णतेच्या लाटा, पूर, दुष्काळ आणि पर्यावरणीय बदलांचा ज्येष्ठ नागरिकांवर होणारा परिणाम स्पष्ट केला. तसेच आपत्ती व्यवस्थापन आणि जोखीम कमी करण्याच्या योजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा स्वतंत्रपणे समावेश करण्याची आवश्यकता त्यांनी मांडली.
प्रमुख वक्ते शैलेश मिश्रा यांनी ज्येष्ठांचा सन्मान राखणारा आणि त्यांना आधार देणारा समाज निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानपूर्ण व स्वावलंबी जीवनासाठी कुटुंब, समाज आणि विविध संस्थांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर डॉ. सायगीता चित्तुरू, डॉ. अर्चना पाटकी, डॉ. नागनाथ नरसिंहन प्रेम आणि डॉ. भालचंद्र पेढंबकर यांच्या सहभागातून परिसंवाद झाला. हवामान बदलाचा ज्येष्ठांच्या आरोग्यावर होणारा परिणाम, स्मृतिभ्रंश, वृद्धांवरील अत्याचार रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच भावनिक व सामाजिक आधाराची गरज या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

COMMENTS