कर्जत : नगरपंचायतीतील अलीकडील राजकीय घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्म
कर्जत : नगरपंचायतीतील अलीकडील राजकीय घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष राहुल नेटके यांनी केली आहे.
राहुल नेटके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पक्षाचे संस्थापक शरद पवार आणि रोहित पवार यांनी कायम भाजपच्या विचारसरणीविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे काही नगरसेवकांकडून भाजपला पाठिंबा दिला जात असल्याची बाब कार्यकर्त्यांसाठी संभ्रम निर्माण करणारी आहे.
ते म्हणाले की, पक्षाचे कार्यकर्ते पक्षाच्या विचारांवर विश्वास ठेवून काम करत असतात. त्यामुळे अशा महत्त्वाच्या निर्णयांबाबत संबंधित नगरसेवकांनी जनतेसमोर आणि पक्षासमोर भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे.
तसेच, आपण ज्येष्ठ नेते शरद पवार आणि आ.रोहित पवार यांच्या विचारांशी आजही निष्ठावान असून भाजपला पाठिंबा देण्याच्या भूमिकेशी आपला कोणताही संबंध नसल्याचे राहुल नेटके यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, पक्षश्रेष्ठींनी या विषयाची दखल घेऊन कार्यकर्त्यांच्या भावना समजून घ्याव्यात आणि पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

COMMENTS