Homeताज्या बातम्याबीड

सर्जेराव तात्या तांदळे यांच्या हस्ते मातोश्री विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत

बीड तालुक्यातील आदर्शगाव वंजारवाडी येथील मातोश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी नवागत विद्यार्थ्यांचे उत्स

‘मुळे’ शाळेच्या ईश्वरीची इस्रो सहलीसाठी निवड
सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षेत अनन्याचे यश
प्राध्यापकांनी संशोधनाकडे गांभीर्याने पाहणे ही काळाची गरज-प्रा.डॉ.महेंद्र शिरसाटतुलसी शैक्षणिक समूहात सेवापूर्ती गौरव समारंभ उत्साहात संपन्न



बीड तालुक्यातील आदर्शगाव वंजारवाडी येथील मातोश्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सकारात्मक सुरुवात व्हावी तसेच त्यांना शाळेच्या विविध उपक्रमांची ओळख व्हावी, या उद्देशाने स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेतील शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व विविध सहशालेय उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन शाळेबद्दल आपलेपणाची भावना निर्माण व्हावी, यासाठी विशेष मार्गदर्शन करण्यात आले. विद्यालयाचे सचिव मा. अ‍ॅड. सर्जेराव तात्या तांदळे, श्री. पांडुरंग नाना राख तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री. नागरगोजे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करत नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहाने सुरुवात केली. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मा. ड. सर्जेराव तात्या तांदळे यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, शिस्त, संस्कार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. जीवनात यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, कठोर परिश्रम आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षणासोबतच व्यक्तिमत्त्व विकासावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये श्री. भुतकर सर, श्री. जाधव सर, श्री. आंधळे सर, श्री. डोंगरे सर, श्री. घरत सर, श्री. बेग सर, श्री. तांदळे सर, श्री. बिनवडे सर, श्री. हानुमंत दादा तांदळे, श्री. प्रदीप बापू तांदळे, श्री. वाघमारे डी. डी. तसेच सौ. सुरेखा घोडके यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम आनंदी, प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात अशा स्वागतपर उपक्रमाने झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

COMMENTS