Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी मंत्री सुबोध मोहिते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

माजी केंद्रीय मंत्री आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुबोध मोहिते यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

प्रियकराने प्रेयसीसह स्वतःला घेतले पेटवून
तरुणाचा खून करून हल्लेखोर पसार | DAINIK LOKMNTHAN
आता वर्षातून चार वेळा होणार मतदार नोंदणी

पुणे/प्रतिनिधी : माजी केंद्रीय मंत्री आणि रामटेक लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुबोध मोहिते यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मोहिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. मोहिते यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात अवजड उद्योग खात्याचे मंत्री म्हणून कामकाज पाहिले आहे.

शिवसेनेत असताना त्यांनी नारायण राणे यांच्यासोबत पक्षाला रामराम ठोकला. मोहिते यांनी शिवसेना, भाजप, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस असा राजकीय प्रवास केला.

मोहिते हे पहिल्यांना शिवसेनेकडून रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून लोकसभेवर गेले होते; मात्र त्यानंतर ते रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊ शकले नाहीत. पुढे त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली; पण तिथेही त्यांना यश मिळाले नाही. त्यानंतर बराच काळापासून मोहिते हे राजकारणापासून अलिप्त होते. त्यानंतर आज अखेर मोहिते यांनी पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पवार यांनी त्यांच्या हाती राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा देत त्यांना पक्षात प्रवेश दिला. या वेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलही उपस्थित होते. मोहिते यांचे विदर्भातील विशेषत: वर्‍हाड भागातील समाजाशी त्यांचे घनिष्ट संबंध आहे. लोकसभेत आम्ही त्यांचे काम पाहिले आहे. लोकसभेत, राज्यसभेत विविध पक्षाचे लोक येत असतात; पण प्रामुख्याने तरुण मंडळींनी एखाद्या विषयाची चांगल्या प्रकारे मांडणी केल्यानंतर अनुभवी लोकांकडून त्यांची दखल घेतली जाते. मोहिते संसंदेत आल्यावर उत्तम काम करणारा तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहत होतो. अलीकडे ते राजकीय वर्तुळापासून बाहेर होते. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन विदर्भात राष्ट्रवादीचे काम वाढवण्याचा शब्द दिला आहे. त्यांच्या अनुभवाचा, कर्तृत्वाचा वापर सामान्य जनतेच्या भल्यासाठी कसा करून घेता येईल, हे राष्ट्रवादी काँग्रेस पाहिले, असे पवार म्हणाले.

COMMENTS