Homeताज्या बातम्या

राजुरी येथे प्रवरेच्या कृषिदूतांकडून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

लोणी : 'चला पर्यावरण संवर्धन करू' या वृक्षारोपण करूया हा संदेश देत राहाता तालुक्यातील राजुरी येथे लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवर

आ.रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यांसोबत भेट रस्ते, पूल आणि न्यायालयासाठी निधीची मागणी
न्यायालयीन कोठडीतील ३५ आरोपी नाशिक कारागृहात श्रीगोंदा-बेलवंडी पोलिसांची कारवाई
शेवगावमध्ये सागवान लाकडाची अवैध वाहतूकवन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?

लोणी : ‘चला पर्यावरण संवर्धन करू’ या वृक्षारोपण करूया हा संदेश देत राहाता तालुक्यातील राजुरी येथे लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेअंतर्गत प्रवरा कृषी शास्त्र संस्थेच्या लोणी येथील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील कृषिदूतांनी वृक्षारोपण करत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील आणि संस्थेचे संचालक डॉ. उत्तमराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राजुरी या ठिकाणी असलेल्या कृषीदूतांनी प्राचार्य संतोष वर्पे, कार्यक्रम समन्वयक सत्येन खर्डे, कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष क्षिरसागर, प्रा. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संघप्रमुख महेश खेडे यांच्यासह सहीत राठोड, सिद्धेश तागड,  सिद्धांत लांडगे, सुहास अदमाने, सिद्धार्थ कांबळे अजिंक्य कानडी आणि किरण माळी या कृषी दूतांनी  गावांमध्ये  वृक्षारोपण करत वृक्ष लागवडी बरोबरच त्याचे संवर्धनही करणे काळाची गरज आहे यावर  ग्रामस्थांचे प्रबोधन केले. यावेळी सरपंच संगीता पठारे, उपसरपंच सोमनाथ गोरे तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रयोगशील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS