Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रगतशील शेतकरी इरफान काझी यांचा मुंबईत गौरव

 शेवगाव : शेवगाव येथील प्रगतशील शेतकरी इरफान भाई काझी यांचा मुंबई येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य आंबा उत्पा

राज्यावर पुढील चार दिवस अस्मानी संकट; अनेक जिल्ह्यांत गारपीट व वादळी पावसाचा इशारा
अशोक खरातला 39 आमदार भेटून गेले, मग माझेच नाव का?माजी मंंत्री दीपक केसरकर यांचा संतप्त सवाल
राज्यात 10 सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या; मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्‍विनी भिडे

 शेवगाव : शेवगाव येथील प्रगतशील शेतकरी इरफान भाई काझी यांचा मुंबई येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

 मुंबईतील रसायन तंत्रज्ञान संस्था (अभिमत विद्यापीठ) येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ. जे. बी. जोशी तसेच कुलगुरू प्रा. अनिरुद्ध पंडित यांच्या हस्ते काझी यांचा सन्मान करण्यात आला. हा क्षण त्यांच्या तसेच शेवगाव परिसरासाठी अभिमानास्पद ठरला.

   काझी यांनी मोठ्या प्रमाणावर शेती व्यवस्थापन करत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून उत्कृष्ट उत्पादन साध्य केले आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शेतीत केलेल्या नवकल्पना आणि प्रयोगशील दृष्टिकोनामुळे त्यांचे कार्य विशेष ठरले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळत आहे. या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत. तसेच या सन्मानासाठी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत मोकल यांचेही मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

COMMENTS