Homeताज्या बातम्या

विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरात परिचारिकांचे दोन तासांचे कामबंद आंदोलन; दुर्लक्ष केल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यातील परिचारिकांनी मंगळवारी सकाळी दोन तासांचे कामबंद आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.

‘मोफत’ योजनांवरून पंजाब सरकारला उच्च न्यायालयाचा झटका; कर्मचाऱ्यांच्या थकबाकीवरून ओढले ताशेरे
समान गुण, वेगवेगळे पर्सेंटाईल; एमएचटी-सीईटी निकालावर विद्यार्थ्यांचा संताप आणि नॉर्मलायझेशन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
काळे गटाचे बिंग फुटले, आंदोलनाच्या नौटंकीचा डाव उधळला : उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांचा घणाघात

छत्रपती संभाजीनगर : विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यातील परिचारिकांनी मंगळवारी सकाळी दोन तासांचे कामबंद आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. सकाळी साडेसात ते साडेनाऊ या वेळेत राज्यभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये परिचारिकांनी सेवा थांबवत निदर्शने केली. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील परिचारिकांनीही या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेत घोषणाबाजी केली.

परिचारिका संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरावीत, पदोन्नतीची रखडलेली प्रक्रिया पूर्ण करावी आणि सेवाविषयक प्रलंबित प्रश्न सोडवावेत, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर हे आंदोलन करण्यात आले. अनेक वेळा शासनाकडे पाठपुरावा करूनही अपेक्षित निर्णय होत नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. महाराष्ट्र शासन परिचारिका महासंघाच्या राज्याध्यक्षा इंदुमती थोरात यांनी शासनाला इशारा देताना सांगितले की, परिचारिका संवर्गाच्या मागण्यांकडे यापुढेही दुर्लक्ष झाल्यास राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्यात येईल. रुग्णसेवा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संघटनेच्या म्हणण्यानुसार, परिचारिका, वरिष्ठ परिचारिका, विभागीय परिचारिका, प्रशिक्षण मार्गदर्शिका, सहाय्यक अधिसेविका आणि अधिसेविका अशा विविध पदांवर मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे विद्यमान कर्मचार्‍यांवर कामाचा ताण वाढत असून, त्याचा परिणाम आरोग्यसेवेवर होत असल्याचा दावा संघटनेने केला आ

Nurses Protest | राज्यातील सरकारी परिचारिकांचे आज दोन तास कामबंद आंदोलन |  Marathi News #NursesProtest #NursesStrike #MaharashtraNurses #NursesNews  #MaharashtraNews #Marathinews #Jaimaharashtranews

COMMENTS