Homeताज्या बातम्याअन्य जिल्हे

ऑपरेशन क्रॅक डाऊनचा दणका : इतवारा पोलिसांकडून 30 लाखांचा हायवा व अवैध रेती जप्त

जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ मोहिमेअंतर्गत इतवारा पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 30 लाख 12 हजार

देवळालीत हातभट्टी दारू अड्ड्यांवर छापा चौघांवर गुन्हा ; ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त
 चाकू हल्ल्यात तरुण गंभीर जखमी
राशीनमध्ये हातभट्टीवर पोलिसांचा छापा७८० लिटर रसायन व दारू नष्ट
३० लाखांच्या अवैध रेतीसह ३ वाहने जप्त! नांदुरा मोताळा मार्गावर पोलिसांची  कारवाई | Navarashtra



जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ मोहिमेअंतर्गत इतवारा पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 30 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे रेती तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या धडक मोहिमेमुळे अवैध धंद्यांवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 13 मे 2026 रोजी पहाटे सुमारे 2.25 वाजण्याच्या सुमारास देगलूर नाका परिसरात इतवारा पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी भरधाव वेगाने जाणारा एक हायवा पोलिसांच्या नजरेस पडला. वाहन संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तत्काळ त्यास थांबवून चौकशी केली. चालकाने आपले नाव राहुल आनंदा पवार (वय 38, रा. टाकळी, ता. मुदखेड) असे सांगितले. यानंतर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता हायवामध्ये कोणतीही अधिकृत परवानगी नसताना अवैधरित्या पाच ब्रास रेती वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एम एच -26/बी डी-1213 क्रमांकाचा हायवा आणि त्यामधील रेती असा एकूण 30 लाख 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुरनं 156/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 303(2) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 48(7) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला  करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार , अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण आगलावे, पोलीस अंमलदार बालाजी चंचलवाड तसेच चुकलवाड यांनी कारवाईत सक्रिय सहभाग घेतला. दरम्यान, जिल्ह्यात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधातील मोहिम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईमुळे अवैध रेती तस्करीवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

COMMENTS