Homeताज्या बातम्या

प्रा. डॉ. माया लहामगे-पाटील यांना ज्ञानज्योती संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार; वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे सत्कार

श्रीरामपूर : प्रा. डॉ. माया शिवाजी पाटील-लहामगे यांना टाकळीभान येथील ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेचा 'राज्यस्तरीय संशोधन आणि आदर्श अध्यापक पुरस्

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे कार्य प्रेरणादायी; प्रा. टी. ई. शेळके यांचे प्रतिपादन
श्रीरामपूर मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६७ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘साहित्यिक फेरफटका’ कर्मवीर चरणी स्तुत्य मानवंदना : प्राचार्य डॉ. शंकरराव गाजरे
‘साहित्यवेल’तर्फे डॉ. बाबुराव उपाध्ये यांचा साहित्यिक सन्मान

श्रीरामपूर : प्रा. डॉ. माया शिवाजी पाटील-लहामगे यांना टाकळीभान येथील ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेचा ‘राज्यस्तरीय संशोधन आणि आदर्श अध्यापक पुरस्कार’ मिळाल्याबद्दल ‘वाचन संस्कृती प्रतिष्ठान’तर्फे त्यांचा गौरव करण्यात आला. श्रीरामपूर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेचे अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी प्रा. डॉ. माया पाटील-लहामगे यांच्या मध्ययुगीन भक्ती संशोधन कार्य आणि उत्कृष्ट अध्यापन कार्याविषयी गौरवोद्गार काढले.

श्रीरामपूर येथील इंदिरा नगरमधील ग्रंथ वाचनालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या कोषाध्यक्ष सौ. मंदाकिनी उपाध्ये यांच्या हस्ते प्रा. डॉ. माया लहामगे-पाटील यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तके आणि शाल देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना प्रा. डॉ. माया लहामगे-पाटील म्हणाल्या की, “टाकळीभान येथील चौथ्या ग्रामीण साहित्य संमेलनात मिळालेला हा पुरस्कार दुर्लक्षित संशोधक आणि अध्यापकांना सेवाकार्यासाठी उपयुक्त ठरणारा व प्रेरणा देणारा आहे. अर्जुन राऊत आणि त्यांची संस्था अनेकांना चांगले व्यासपीठ मिळवून देत आहे. चांगल्याला चांगले म्हणण्याची संस्कृती वाढली पाहिजे.” ग्रंथ वाचनालयात झालेला हा सन्मान देवपूजेसारखा पवित्र आहे, अशा भावना व्यक्त करत त्यांनी सर्वांचे आभार मानले.

यावेळी दीपक पाटील यांनी सत्काराची प्रेरणा सदैव चांगल्या कार्याला बळ देते असे सांगून आभार मानले. कार्यक्रमाला तितिक्षा पाटील, गणेशानंद उपाध्ये, निर्मिक उपाध्ये यांच्यासह स्नेहमिञ परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

COMMENTS