Homeताज्या बातम्या

प्रा.बी.एच.तेलोरे यांना पीएच.डी. पदवी

अकोले : तालुक्यातील राजूर येथील सत्यनिकेतन संस्थेचे ऍड. एम. एन. देशमुख कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयाचे प्रा. बी. एच. त

मुंबई महापालिकेला तुकाराम मुंढेंचा दणका; पालिका मुख्यालयातील कँटीन केले सील!
सिक्कीम बोगदा दुर्घटनेतील मृतांची संख्या २० वर; ५ जण अद्याप अडकले, मिथेन वायूमुळे बचावकार्याला अडथळे
बीड शिक्षण अधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार भगवान सोनवणे यांच्याकडे

अकोले : तालुक्यातील राजूर येथील सत्यनिकेतन संस्थेचे ऍड. एम. एन. देशमुख कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयाचे प्रा. बी. एच. तेलोरे यांनी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या नवसंजीवन योजनेची अंमलबजावणी व मूल्यमापन या विषयावर सखोल संशोधन करून सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाकडून पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे.

प्रा. बी. एच. तेलोरे यांनी आपल्या संशोधनामध्ये नवसंजीवन योजनेच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा अभ्यास केला. तसेच योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी, लाभार्थ्यांवरील परिणाम, प्रशासनिक कार्यपद्धती आणि योजनेची परिणामकारकता यांचे सखोल मूल्यमापन केले.

प्रा. बी. एच. तेलोरे यांनी या यशाचे श्रेय आपल्या संशोधन मार्गदर्शक प्रो. डॉ. सुरेश देवरे व प्राचार्य डॉ. विलास आवारी ,वडील कै. हरिदास तेलोरे व कुटुंबीय, सहकारी तसेच संशोधन कार्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व संबंधितांना दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष ऍड.मनोहरराव देशमुख,सचिव एम.एल. मुठे, कोषाध्यक्ष विवेकजी मदन, माजी सचिव तथा प्राचार्य टी. एन. कानवडे,संचालक प्रकाश टाकळकर, एस.टी.येलमामे,विजय पवार,सत्यनिकेतन संस्थेचे सर्व संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख व सर्व सहकारी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS