Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोले तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रा. अमोल वैद्य

अकोले ः अकोले तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी ज्येष्ठ पत्रकार प्रा. अमोल वैद्य व सेक्रेटरीपदी प्रा. चंद्रशेखर हासे यांची सर्वानुमते निवड करण्

डॉ. भास्कर मोरेला अटक करण्याची पोलिसांनी कृती करावी
चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण
BREAKING: अहमदनगर मध्ये कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ | Ahmednagar Coronavirus | LokNews24

अकोले ः अकोले तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी ज्येष्ठ पत्रकार प्रा. अमोल वैद्य व सेक्रेटरीपदी प्रा. चंद्रशेखर हासे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तालुका पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा सर्वोदय वसतिगृह, अकोले येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.सभेत पुढील प्रमाणे कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
अध्यक्षपदी अमोल वैद्य, उपाध्यक्ष शांताराम काळे, प्रा. मच्छिंद्र देशमुख, राजेंद्र मालुंजकर, सेक्रेटरी प्रा. चंद्रशेखर हासे, खजिनदार प्रकाश आरोटे, सहसचिव अनिल नाईकवाडी यावेळी ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलिक, शांताराम गजे, प्रकाश टाकळकर, विजय पोखरकर, भाऊसाहेब चासकर, हेमंत आवारी, विद्याचंद्र सातपुते, प्रकाश महाले, नरेंद्र देशमुख, हे उपस्थित होते. पत्रकार संघाच्यामार्फत आगामी काळात विविध उपक्रम राबविण्याचा मनोदय अध्यक्ष अमोल वैद्य यांनी व्यक्त केला. तर सेक्रेटरी प्रा. चंद्रशेखर हासे यांनी आभार मानले.

COMMENTS