Homeताज्या बातम्या

नववीच्या पुस्तकातून संविधानाची प्रस्तावना वगळली

नवी दिल्ली : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने नववीच्या समाजशास्त्र विषयाच्या नव्या पुस्तकात काही महत्त्वाचे बदल केले आहेत. संविधा

मुंबईच्या अंधेरी येथील टी-२ विमानतळ भूमिगत मेट्रो स्टेशनवर आग; प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले
धावत्या विमानातून प्रवाशाने मारली उडी;चेन्नई विमानतळावरील घटना; रनवे एका तासासाठी ठेवला बंद
अटलांटिकमध्ये अडकलेलं ‘डेथ शिप’! २०० जीवांवर मृत्यूचं सावट


नवी दिल्ली : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने नववीच्या समाजशास्त्र विषयाच्या नव्या पुस्तकात काही महत्त्वाचे बदल केले आहेत. संविधानाची प्रस्तावना या आवृत्तीत समाविष्ट करण्यात आलेली नसून, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या संज्ञांचाही स्वतंत्र उल्लेख आढळत नाही. भारत आणि त्यापलीकडे’ या प्रकरणात आणीबाणीच्या काळाला भारतीय लोकशाहीपुढील मोठ्या आव्हानांपैकी एक म्हणून मांडण्यात आले असून, त्यासाठी स्वतंत्र विभागाचा समावेश करण्यात आला आहे.पुस्तकात संविधान निर्मिती, लोकशाही संस्था आणि नागरिकांचे मूलभूत अधिकार यांचा आढावा देण्यात आला आहे. मात्र, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य या मूल्यांबाबत पूर्वीप्रमाणे सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.

COMMENTS