Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

धावत्या विमानातून प्रवाशाने मारली उडी;चेन्नई विमानतळावरील घटना; रनवे एका तासासाठी ठेवला बंद

चेन्नई : तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी पहाटे एक धक्कादायक प्रकार घडला. शारजाहहून आलेल्या एका प्रवासी विमानातू

नववीच्या पुस्तकातून संविधानाची प्रस्तावना वगळली
अटलांटिकमध्ये अडकलेलं ‘डेथ शिप’! २०० जीवांवर मृत्यूचं सावट
मुंबईच्या अंधेरी येथील टी-२ विमानतळ भूमिगत मेट्रो स्टेशनवर आग; प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले

चेन्नई : तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी पहाटे एक धक्कादायक प्रकार घडला. शारजाहहून आलेल्या एका प्रवासी विमानातून एका प्रवाशाने आपत्कालीन बाहेर पडण्याचा दरवाजा उघडून अजून हालचाल सुरू असतानाच खाली उडी मारली. या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव मुख्य धावपट्टी काही काळासाठी बंद ठेवावी लागली.
विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विमान धावपट्टीवर उतरल्यावर ते टॅक्सी मार्गावरून पुढे सरकत होते. पूर्णपणे थांबण्याआधीच प्रवाशाने अचानक आपत्कालीन दरवाजा उघडला आणि खाली उडी घेतली. या अनपेक्षित घटनेमुळे विमानातील इतर प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. तातडीने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. विमानतळावरील वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले की, उडी मारताना विमान अतिशय कमी वेगाने पुढे जात होते. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून विमानालाही नुकसान झालेले नाही. तसेच हा प्रकार मुख्य धावपट्टीवर नव्हे, तर टॅक्सी मार्गावर घडल्याचेही स्पष्ट करण्यात आले. प्राथमिक चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित प्रवाशाची प्रवासादरम्यान तब्येत बिघडली होती. त्याला मळमळ होत असून त्याने दोन वेळा उलटी केल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. त्याच्या या शारीरिक अस्वस्थतेमुळेच त्याने घाईगडबडीत असे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. घटना घडल्यानंतर वैमानिकाने त्वरित जमिनीवरील सुरक्षा यंत्रणेला कळवले. त्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यांच्या जवानांनी तातडीने धाव घेत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. पुढील चौकशीसाठी त्याला स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या घटनेमुळे विमानतळावरील कामकाज काही काळ विस्कळीत झाले. खबरदारीचा उपाय म्हणून पहाटे सुमारे एक तास मुख्य धावपट्टी बंद ठेवण्यात आली. त्या कालावधीत ये-जा करणारी विमाने पर्यायी धावपट्टीवर वळवण्यात आली, असे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

COMMENTS