Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्यास आश्‍चर्य नको ः राज ठाकरे

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये झालेल्या बंडावर विविध पक्षांच्या नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत असतांना, सोमवारी पत्रकारां

महायुतीमध्ये चौथा भिडू होणार दाखल ?
राज ठाकरेंनी केली उद्धव ठाकरेंची भन्नाट नक्कल
मराठी पाटी हवी म्हणजे हवी ः  राज ठाकरे

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये झालेल्या बंडावर विविध पक्षांच्या नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत असतांना, सोमवारी पत्रकारांशी बोलतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलकी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले आहे की, सुप्रिया सुळे या केंद्रात मंत्री झाल्यास आश्‍चर्य वाटायला नको, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच अजित पवार बंड करू शकतात, मात्र छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील ही मंडळी त्यात सहभागी होवू शकत नाही, शरद पवारांनी हिरवा कंदील दाखवल्याशिवाय ते यात सहभागी होणार नसल्याचा दावा रज ठाकरे यांनी केला आहे.
एकदा माघार घ्यावे लागलेले अजित पवार पुन्हा हे धाडस करू शकतात का, याबाबतही चर्चा आहे. या पार्श्‍वभूमीवर अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांनी पुन्हा एकदा पक्षबांधणीचा निर्धार बोलून दाखवला आहे. त्याप्रमाणे ते दौर्‍यासाठी बाहेर देखील पडले आहेत. अजित पवार व इतर नेत्यांनी जे काही केले त्याच्याशी माझा संबंध नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज ठाकरे यांनी मात्र यावर वेगळे मत मांडले आहे. ’पवार साहेब काहीही म्हणत असले तरी दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल किंवा छगन भुजबळ हे लोक असेच जाणार नाहीत. पाठवल्याशिवाय ते जाऊच शकत नाहीत. त्यामुळे उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी मला आश्‍चर्य वाटणार नाही, असेही राज म्हणाले. एकूण घडामोडींबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. ’महाराष्ट्रात दोन-अडीच वर्षांपासून जे राजकारण सुरू झालेले आहे, ते दिवसेंदिवस किळसवाणे होत चाललेले आहे. मतदारांशी यांना काही देणेघेणे नाही. निष्ठावंत मतदारांचा यांना विसर पडला आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी वाट्टेल ती तडजोड करायची हेच सुरू आहे. लोकांनी ह्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

COMMENTS