Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मान्सूनपूर्व पावसाचा कोपरगाव, नेवाशाला तडाखा; शेतीचे नुकसान; वीजपुरवठा खंडित; झाडे कोलमडली

कोपरगाव :  तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांची तारांबळ उडवली. पोहेगाव, रांजणगाव देशमुख तसेच परिसरातील

अवकाळी पावसाने नांदेड शहराला झोडपले; रस्ते जलमय, होर्डिंग्ज कोसळली, वीजपुरवठा खंडित
बेंगळुरूमध्ये गारांचा पाऊस; तळपत्या उन्हात शहराला काश्मीरचे स्वरूप
उष्णतेचा कहर आणि अवकाळीचा प्रहार
Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यातील 'या' भागांना अवकाळी पावसाने जोरदार  झोडपले, कांदा-गव्हाचे नुकसान | Navarashtra

कोपरगाव :  तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांची तारांबळ उडवली. पोहेगाव, रांजणगाव देशमुख तसेच परिसरातील अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकरी आणि नागरिक चिंतेत सापडले आहेत. अचानक आलेल्या ढगाळ वातावरणानंतर जोरदार बारे सुरू झाले. त्यानंतर काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. बादळी बाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या तर वीजपुरवठाही खंडित झाला होता. अवकाळी पावसामुळे विशेषतः कांदा, भाजीपाला व फळबागांना पावसाचा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचे कांदे भिजले आहेत. आधीच भाव नाही त्यात पाऊसाचा तडाख्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, हवामानातील बदलामुळे पुढील काही दिवस सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
 नेवासा तालुक्यातील पश्चिमेकडे असणाऱ्या पाचेगाव, बेलपिंपळगाव, पुनतगाव, खुपटी व निंभारी या परिसरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली, पण याबरोबर आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली. झाडे पडल्याने दळणवळणाचे रस्ते काहीकाळ बंद झाले होते. जोरदार बाऱ्यामुळे काही ठिकाणी नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती कळली आहे. त्यात निभारी येथील नारायण प्रल्हाद जाधव यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर लिंबाचे झाड पडल्याने ट्रॅक्टरचे नुकसान झाले. तर खुपटी व पाचेगाव गणाचे माजी पंचायत समिती सदस्य विक्रम साहेबराव चौधरी यांच्या बंगल्यासमोर लावलेल्या गाडीवर झाड पडल्याने चौधरी यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. तसेच एक पत्र्याची टपरी देखील या वाऱ्यात उडून गेल्याची माहिती मिळाली आहे. जोरदार वाऱ्यामुळे परिसरातील वीज खंडित झाली होती.
 राहुरी शहरासह तालुक्यात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. दिवसभर प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना सायंकाळी झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी आंबा व जांभूळ पिकांचे नुकसान झाले असून काही भागात वीज पुरवठाही खंडित झाला होता.  
   जोरदार वारा, मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह राहुरी शहर, टाकळीमिया, देवळाली प्रवरा, उंबरे, वांबोरी ब्राम्हणी परिसरात पावसाला सुरुवात झाली. वादळी वाऱ्यामुळे ग्रामीण भागात आंब्याच्या फळांची मोठ्या प्रमाणात गळती झाली. तसेच जांभळाच्या झाडांनाही फटका बसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या. राहुरी शहरासह ग्रामीण भागात काही काळ वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला.  

COMMENTS