अहमदनगर जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये अकरा डिसेंबर रोजी लोकअदालत

Homeताज्या बातम्या

अहमदनगर जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये अकरा डिसेंबर रोजी लोकअदालत

अहमदनगर/प्रतिनिधी : अहमदनगर जिल्हयातील सर्व न्यायालयामध्ये शनिवार, 11 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कोरोना न

केवळ 9 रुपयांत मिळवा एलपीजी सिलिंडर, जाणून घ्या कसे करायचे बुकिंग | | Lok News24
स्थापना दिवस समितीच्या संयोजकपदी ढोकरीकर
खाजगी सावकाराच्या जाचास कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर/प्रतिनिधी : अहमदनगर जिल्हयातील सर्व न्यायालयामध्ये शनिवार, 11 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कोरोना नियमावलीचे पालन करून अधिकाधिक पक्षकारांनी सहभागी होवून न्यायालयात दाखल असलेली प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढावीत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा व सचिव रेवती देशपांडे यांनी केले आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या सूचनेनुसार आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. ही लोकअदालत आभासी पध्दतीव्दारे देखील आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार बरीच प्रकरणे आभासी पध्दतीने हाताळण्यात येतील तसेच प्रत्यक्ष उपस्थित होणार्‍या लोकअदालतींना देखील बर्‍याच पक्षकारांना उपस्थित राहण्याबाबत आभासी तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे. अहमदनगर जिल्हा मुख्यालयासह जिल्हयातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयांमध्ये घेण्यात येत असलेल्या या लोकअदालतीमध्ये न्यायालयातील दिवाणी, फौजदारी, एन. आय. अ‍ॅक्टची प्रकरणे, बँकेची कर्ज वसुली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार कायद्याखालील प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, इलेक्ट्रीसीटी अ‍ॅक्ट समझोता प्रकरणे तसेच न्यायालयात येण्याअगोदरची दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार असून पक्षकारांनी आपसी समझोत्याकरिता ठेवून ती सामंजस्याने सोडवावीत तसेच ज्या नागरिकांना आपली प्रकरणे या लोकअदालतीमध्ये ठेवायची असतील, त्यांनी संबंधीत न्यायालयात किंवा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय किंवा तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

COMMENTS