Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खासगी शिकवणीचालक आक्रमक

केंद्र सरकारच्या नियमावलीविरोधात न्यायालयात मागणार दाद

पुणे : केंद्र सरकारने 16 वर्षांखालील मुलांसाठी शिकवण्याच नकोत हा नियम अन्यायकारक असल्याचे सांगत खासगी शिकवणी चालकांनी केंद्र सरकारच्या नियमावलीवि

Beed : बीड जिल्ह्यातील ईनामी देवस्थान जमिन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करा (Video)
सुसंस्कारी पिढी घडविण्याचे कार्य वाचनालयाच्या माध्यमातून होणार -आ. निलेश लंके
पाच लाखाची खंडणी मागितली, पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : केंद्र सरकारने 16 वर्षांखालील मुलांसाठी शिकवण्याच नकोत हा नियम अन्यायकारक असल्याचे सांगत खासगी शिकवणी चालकांनी केंद्र सरकारच्या नियमावलीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारच्या नियमावलीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील खासगी शिकवणी चालकांची नाशिक येथे 28 जानेवारीला बैठक होणार आहे. केंद्र सरकारच्या नियमावलीच्या नियमावलीविरोधात न्यायालयात दाद मागण्याची तयारी करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, विविध स्पर्धा आणि प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठीच्या शिकवण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकतीच नियमावली जाहीर केली. या नियमावलीनुसार दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या किंवा वयाची 16 वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाच आता शिकवणी वर्गाला प्रवेश देता येणार आहे. त्याचबरोबर किमान पदवी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच शिक्षक म्हणून नियुक्त करता येईल. त्याचबरोबर प्रत्येक शिकवणी वर्गाने समुपदेशाची नियुक्ती करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍या शिकवण्यांना 1 लाख रुपयांपर्यंत दंड करण्याची किंवा नोंदणी रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यांत नव्याने सुरू होणार्‍या किंवा असलेल्या शिकवण्यांनी नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नोंदणी, पडताळणी, कारवाई आणि एकूण नियमनाची जबाबदारी राज्य शासनांची असेल, असेही नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.

COMMENTS