Homeताज्या बातम्यादेश

पेट्रोल-डिझेल तीन रूपयांनी महागलेनव्या दरांमुळे सर्वसामान्यांवर आर्थिक ताण

नवी दिल्ली : देशभरात पेट्रोल, डिझेल आणि संपीडित नैसर्गिक वायूच्या दरात वाढ करण्यात आली असून, नव्या दरांची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू झाली आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची 95.75 विक्रमी घसरण
रुपयाची घसरण ऐतिहासिक नीचांकी पातळीवर95.94 वर पोहोचला रूपया ; महागाईचा भडका उडण्याची शक्यता
पंतप्रधानांनी ताफ्यातील वाहनांची संख्या केली कमीकेवळ दोन गाड्या घेऊन पोहोचले कॅबिनेट बैठकीला


नवी दिल्ली : देशभरात पेट्रोल, डिझेल आणि संपीडित नैसर्गिक वायूच्या दरात वाढ करण्यात आली असून, नव्या दरांची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरू झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे 3 रुपयांहून अधिक वाढ झाल्याने वाहतूक, मालवाहतूक आणि दैनंदिन खर्चावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर जवळपास 98 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचला असून डिझेलही 90 रुपयांच्या पुढे गेले आहे. मुंबईत पेट्रोल 106 रुपयांच्या पुढे, तर डिझेल 93 रुपयांच्या आसपास विकले जात आहे. कोलकाता आणि चेन्नईसारख्या महानगरांमध्येही इंधनदरांनी शंभरीकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळमधील अनेक भागांत पेट्रोलचे दर 110 रुपयांच्या पुढे गेले असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली परिसरात संपीडित नैसर्गिक वायूच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी तसेच खासगी वाहनधारकांच्या खर्चात वाढ होणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातही सीएनजीचे दर वाढून 84 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. इंधनदरवाढीबरोबरच दुधाच्या किमतीतही वाढ करण्यात आली आहे. वाढत्या उत्पादन खर्चाचा दाखला देत काही दुग्ध कंपन्यांनी प्रतिलिटर 2 रुपयांपर्यंत दरवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मासिक खर्चावर आणखी ताण वाढण्याची शक्यता आहे. पश्‍चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर दबाव वाढला असून आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 100 डॉलरच्या पुढे गेले आहेत. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनल्याचे मानले जात आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी देशात इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले आहे. जागतिक संकट असूनही पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाक गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ हे या दरवाढीमागील प्रमुख कारण मानले जात आहे. इराण-अमेरिका संघर्ष तीव्र होण्यापूर्वी कच्च्या तेलाचे दर सुमारे 70 डॉलर प्रति बॅरल होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत ते 100 डॉलरच्या पुढे गेले आहेत.
उत्पादन शुल्कात कपात करूनही दरवाढ
आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती आणि वाढता आर्थिक ताण लक्षात घेता आता पुन्हा इंधन दरवाढ करण्यात आली आहे. यापूर्वी केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात करून इंधनदर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पेट्रोल आणि डिझेलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क कमी केल्यामुळे काही काळ दरवाढ रोखण्यात यश आले होते. मात्र जागतिक बाजारातील परिस्थिती बिघडल्याने आता त्याचा परिणाम देशांतर्गत दरांवर दिसू लागला आहे.

COMMENTS