Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र दिनापासून मुस्लिम आरक्षणासाठी आंदोलनाची तयारी; आज जामा मस्जिद येथे महत्त्वाचा मशवेरा

बीड : मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण तसेच स्वसंरक्षणाच्या मागणीसाठी 1 मे 2026 पासून आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असून, य

पालकमंत्री अतुल सावे यांचा नांदेड जिल्हा दौरा
पोलीस निरीक्षक मुख़्तारखान पठाण यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान
कोपरगावमध्ये महाराष्ट्र दिनी वीरपत्नीच्या हस्ते ध्वजारोहण 
Muslim Reservation: ५ टक्के आरक्षणासाठी आता मुस्लिम समाज आक्रमक; पुकारला  एल्गार!

बीड : मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण तसेच स्वसंरक्षणाच्या मागणीसाठी 1 मे 2026 पासून आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असून, या आंदोलनाच्या पुढील दिशा व रूपरेषा ठरवण्यासाठी आज बीड येथील जामा मस्जिद येथे महत्त्वाचा मशवेरा (बैठक) आयोजित करण्यात आला आहे.
आज सायंकाळी 9 वाजता होणार्‍या या बैठकीत धर्मगुरूंच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाची रणनीती निश्चित केली जाणार आहे. तसेच आगामी आंदोलन अधिक प्रभावी व संघटित करण्याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. मागील काळात न्यायालयाच्या निर्णयानुसार मुस्लिम समाजाला शिक्षण क्षेत्रात 5 टक्के आरक्षण देण्यात आले होते, मात्र ते नंतर तत्कालीन सरकारने रद्द केल्याचा मुद्दा या बैठकीत उपस्थित केला जाणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलन अधिक यशस्वी करण्यासाठी होणार्‍या या बैठकीस सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, वकील, डॉक्टर, युवक, विद्यार्थी तसेच पत्रकार व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुस्लिम आरक्षण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS