कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा वातावरण तापले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टीका करत, गोकुळ दूध संघाला गुजरातच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप गुरूवारी केला.
समविचारी आघाडीच्या कार्यक्रमात बोलताना शेट्टी म्हणाले की, गोकुळ ही केवळ दूध संस्था नसून हजारो शेतकरी कुटुंबांच्या कष्टाची आणि सहकार परंपरेची ओळख आहे. अशा संस्थेच्या भवितव्याबाबत निर्णय घेताना शेतकर्यांचे हित सर्वोच्च मानले गेले पाहिजे. गोकुळवर एकीकडे कर्नाटकातील दुग्ध संस्थांचे तर दुसरीकडे गुजरातमधील मोठ्या सहकारी संस्थांचे आर्थिक आणि व्यापारी आव्हान वाढत असताना राज्यातील सत्ताधारी नेते मात्र मौन बाळगत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, गोकुळसारखी स्वायत्त संस्था बाहेरील प्रभावाखाली नेण्याचा प्रयत्न सुरू आहे का? जर तसे असेल, तर शेतकरी आणि सभासदांनी सावध राहण्याची गरज आहे. राज्यातील सत्ताधारी आघाडीत एकाही नेत्याने या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेतलेली दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. गोकुळच्या निवडणुकीत महायुतीतील विविध घटक पक्षांनी एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली समविचारी आघाडी उभी राहिली आहे. या आघाडीला राजू शेट्टी यांचाही पाठिंबा मिळाला असून त्यांनी प्रचारसभांमधून सत्ताधार्यांवर टीकेची झोड उठवली आहे. शेट्टी यांनी गोकुळमध्ये प्रशासक नेमण्याच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संस्थेच्या कारभारात बाह्य हस्तक्षेप वाढवून भविष्यातील सत्तासमीकरणे बदलण्याचा प्रयत्न झाला का, याची चौकशी होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. गोकुळची मालकी आणि नियंत्रण हे शेतकरी व सभासदांच्या हातीच राहिले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. दरम्यान, सतेज पाटील यांनीही गोकुळ हा कोल्हापूरच्या स्वाभिमानाचा विषय असल्याचे स्पष्ट केले.
गोकुळच्या निवडणुकीवरून पेटले रण
गोकुळच्या निवडणुकीवरून सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही आक्रमक पावित्रा घेतला असून, हसन मुश्रीफ गटाने 2 हजार 65, शिंदे गटाने 1 हजार 512, भाजप आणि महाडिक गटाने 1,431, कोरे गटाने 545 ठराव दाखल केले आहेत; सत्ताधारी सतेज पाटलांच्या समविचारी आघाडीने 1,851 ठराव दाखल केले आहेत. त्यामुळे आता हे ठराव एकत्रित केले तर 7,404 होत आहेत. मात्र गोकुळ दूध संघाचे पात्र ठरावांची संख्या फक्त 4,448 आहे. त्यामुळे आता हे वाढलेले ठरावधारक नेमके आहेत तरी कोण, असा प्रश्न पडला आहे.

COMMENTS