Homeव्हिडीओ

नागपूरमध्ये चहा पिण्यासाठी थांबणे पडले महाग; बँकेतून काढलेले ५ लाख रुपये चोरांनी अवघ्या काही सेकंदांत कारमधून केले लंपास, थरारक घटना CCTV मध्ये कैद!

https://youtu.be/gzO2H2joV9A नागपूरच्या खापरखेडा परिसरातून भरदिवसा ५ लाख रुपयांची बॅग चोरीला गेल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खाजगी

रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून बिष्णोई गँगची धमकी
“सत्य बाहेर आले तर भूकंप होईल, अनेक मोठे लोक यात सामील आहेत”; राम मंदिर दानपेटी चोरी प्रकरणावर भाजप नेते बृजभूषण सिंह यांचे खळबळजनक वक्तव्य!
मुंबई विमानतळावरून 5 कोटीचे सोने जप्तराजकीय पदाधिकार्‍यासह पाच जण ताब्यर्चीं

नागपूरच्या खापरखेडा परिसरातून भरदिवसा ५ लाख रुपयांची बॅग चोरीला गेल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खाजगी कंपनीचे कर्मचारी संपत साहू आणि चालक अतुल काळे हे नागपूरच्या शंकर नगर येथील एका बँकेतून ५ लाख रुपये काढून सावनेरकडे जात होते. वाटेत पिपळा डाकबंगला राष्ट्रीय महामार्गावरील एका रेस्टॉरंटसमोर ते चहा पिण्यासाठी थांबले. त्यांनी पैशांची बॅग गाडीच्या डॅशबोर्डवरच ठेवली आणि ते गाडीबाहेर पडले. मात्र, यावेळी कारचे दरवाजे आणि खिडक्या पूर्णपणे लॉक नव्हत्या. याच गोष्टीचा फायदा घेत आधीपासूनच पाळत ठेवून असलेल्या एका चोराने तोंडाला कापड बांधून अत्यंत चलाखीने कारचा दरवाजा उघडला आणि काही सेकंदांतच पैशांची बॅग लंपास केली. इतक्यात तिथे विना नंबर प्लेटच्या बाईकवर त्याचा दुसरा साथीदार आला आणि दोघेही सुसाट वेगाने पसार झाले. चोरीची ही संपूर्ण थरारक घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. चोरांना या पैशांबद्दल आधीच टीप मिळाली होती का, याचा तपास खापरखेडा पोलीस करत आहेत. इतकी मोठी रक्कम गाडीतच ठेवून चहा पिण्यासाठी जाणे या निष्काळजीपणावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत.

COMMENTS