Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरेगाव ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत फाळके गटाची बाजी

कर्जत : तालुक्यातील कोरेगाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीनमधील एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवाजीराव फाळके पाटील गटाच्या दिपिका चंद्रकांत परदेशी विजयी झाल्या. त्यांना ५३६ मते मिळाली, त्यांच्याविरोधी असणाऱ्या बापूराव शेळके यांच्या गटाच्या पूजा धीरज सिंग परदेशी यांना ४६० मते मिळाली. निकाल जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला.  या प्रसंगी उदयसिंग परदेशी, काकासाहेब शेळके, दादासाहेब फाळके, श्रीमंत शेळके, दिलीप जाधव, बद्रीसिंग परदेशी, लक्ष्मणसिंग परदेशी, तसेच विष्णु महाराज परदेशी, अजित सिंह फाळके आदी मान्यवर उपस्थित होते. विजयानंतर बोलताना शिवाजीराव फाळके म्हणाले की, ही निवडणूक बिनविरोध व्हावी ही आमची इच्छा होती. पराभूत उमेदवार देखील आपलेच आहेत.  काही गैरसमज झाल्यामुळे ते नाराज झाले होते आणि नेमका याचा फायदा विरोधकांनी उठवला. मात्र भविष्यामध्ये त्यांची नाराजी दूर करू. या निवडणुकीमध्ये  आ. रोहित पवार व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे या दोघांनीही मदत केली.   दादासाहेब फाळके म्हणाले, ही निवडणूक खऱ्या अर्थाने निधन झालेल्या उमेदवाराला विजयाची श्रद्धांजली आहे. निवडणूक बिनविरोध करण्याची आमची खूप इच्छा होती कारण जे पराभूत झाले आहेत ते देखील आमचेच आहे. त्यांनी आम्हाला केलेली मदत आम्ही भविष्यामध्ये देखील कधीच विसरणार नाही.  पुढील काळामध्ये देखील सर्वांनी एकत्र येऊन आगामी निवडणुकांना सामोरे जाऊ. यावेळी माजी सरपंच काकासाहेब शेळके, दिलीप जाधव यांची भाषणे झाली. आभार सूर्यपालसिंह परदेशी यांनी मानले.

नगराध्यक्ष रोहिणी घुलेंच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ड्रोन कार्यशाळेचास उत्स्फूर्त प्रतिसाद
विकास लवांडे यांच्यावरील भ्याड हल्ला अत्यंत दुर्दैवीबाळासाहेब थोरात : शासन पाठीशी घालते हे दुर्दैव; संग्राम भंडारे यांच्या कृतीचा निषेध

कर्जत : तालुक्यातील कोरेगाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक तीनमधील एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवाजीराव फाळके पाटील गटाच्या दिपिका चंद्रकांत परदेशी विजयी झाल्या. त्यांना ५३६ मते मिळाली, त्यांच्याविरोधी असणाऱ्या बापूराव शेळके यांच्या गटाच्या पूजा धीरज सिंग परदेशी यांना ४६० मते मिळाली. निकाल जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला. 

या प्रसंगी उदयसिंग परदेशी, काकासाहेब शेळके, दादासाहेब फाळके, श्रीमंत शेळके, दिलीप जाधव, बद्रीसिंग परदेशी, लक्ष्मणसिंग परदेशी, तसेच विष्णु महाराज परदेशी, अजित सिंह फाळके आदी मान्यवर उपस्थित होते.

विजयानंतर बोलताना शिवाजीराव फाळके म्हणाले की, ही निवडणूक बिनविरोध व्हावी ही आमची इच्छा होती. पराभूत उमेदवार देखील आपलेच आहेत.  काही गैरसमज झाल्यामुळे ते नाराज झाले होते आणि नेमका याचा फायदा विरोधकांनी उठवला. मात्र भविष्यामध्ये त्यांची नाराजी दूर करू. या निवडणुकीमध्ये  आ. रोहित पवार व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे या दोघांनीही मदत केली.

  दादासाहेब फाळके म्हणाले, ही निवडणूक खऱ्या अर्थाने निधन झालेल्या उमेदवाराला विजयाची श्रद्धांजली आहे. निवडणूक बिनविरोध करण्याची आमची खूप इच्छा होती कारण जे पराभूत झाले आहेत ते देखील आमचेच आहे. त्यांनी आम्हाला केलेली मदत आम्ही भविष्यामध्ये देखील कधीच विसरणार नाही.  पुढील काळामध्ये देखील सर्वांनी एकत्र येऊन आगामी निवडणुकांना सामोरे जाऊ. यावेळी माजी सरपंच काकासाहेब शेळके, दिलीप जाधव यांची भाषणे झाली. आभार सूर्यपालसिंह परदेशी यांनी मानले.

COMMENTS