Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाफना पॉलिमर्सने नेले जामखेडचे नाव जागतिक पातळीवर

जामखेड ः जामखेड येथील बाफना पॉलिमर्स इंडिया या कंपनी चायना देशातील न्यू वांकाई कंपनीची ऑथोराइज डिस्ट्रीब्यूटर झाल्याने जामखेडच्या उद्योगाची ख्यात

पुणतांबा-वाकडी रस्त्यासाठी 9.63 कोटीची मान्यता
शेवटी महिलाच उतरल्या राखेसाठी रस्त्यावर l पहा LokNews24
निस्वार्थ भावनेतून केलेल्या कार्याला यश मिळतेच ः ज्ञानदेव गवारे

जामखेड ः जामखेड येथील बाफना पॉलिमर्स इंडिया या कंपनी चायना देशातील न्यू वांकाई कंपनीची ऑथोराइज डिस्ट्रीब्यूटर झाल्याने जामखेडच्या उद्योगाची ख्याती आता जगभरात पोहचवली आहे. जामखेडचे नाव उद्योग क्षेत्रात बाफना परिवाराने जागतिक पातळीवर नेले आहे ही जामखेड करांसाठी अभिमानाची बाब आहे.
जामखेड येथील बाफना उद्योग समूहातर्फे आतापर्यंत बाफना पॉलिमर इंडिया, जलमोती पाणी, बाफना पेट्रोलियम या उद्योगाची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात आहेच याचबरोबर बाफना उद्योग समूहातर्फे जखङ झए-ठङ शुद्ध खाद्यतेल नवीन व्यवसायामध्येही आपला नावलौकिक मिळवला आहे. बाफना ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मधील बाफना पॉलिमर्स इंडिया या कंपनीची उत्तुंग भरारी चायना देशातील न्यू वांकाई कंपनी चे झाले ऑथोराइज डिस्ट्रीब्यूटर इन इंडिया आता संपूर्ण भारतामध्ये मध्ये प्री-फॉर्म बनवणार्‍या कंपन्यांना कच्चामालाचा पुरवठा सेवा देण्यासाठी सज्ज झालो आहे असे मॅनेजिंग डायरेक्टर आकाश बाफना यांनी सांगितले. बाफना कंपनीने आता जगभरातील कंपन्यांशी संपर्क साधून भारतीय बाजारपेठेमध्ये कमीत कमी किंमतीमध्ये जास्तीत जास्त मालाचा पुरवठा करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे अशी माहिती बाफना इंडस्ट्रीज प्लांट हेड कृष्णराव चव्हाण, प्रोडक्शन हेड परशुराम भांगे, सेल्स हेड अशोक कुमटकर, यश भंडारी व इतर सर्व उपस्थित सहकारी यांनी दिली. उद्योग क्षेत्रातील आपल्या दर्जा व गुणवत्तेसाठी बाफना उद्योग समुहास 2022 मध्ये पुणे याठिकाणी राज्यस्तरीय महाराष्ट्र उद्योग पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. आता पॉलिमर्स इंडिया या कंपनीची उत्तुंग भरारी घेतली आहे. चायना देशातील न्यू वांकाई कंपनीचे ते ऑथोराइज डिस्ट्रीब्यूटर झाले आहेत. इन इंडिया आता संपूर्ण भारतामध्ये मध्ये प्री-फॉर्म बनवणार्‍या कंपन्यांना कच्चामालाचा पुरवठा सेवा देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

COMMENTS