नागवडे कारखान्याची बदनामी थांबवा.. आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा देऊ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागवडे कारखान्याची बदनामी थांबवा.. आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा देऊ

श्रीगोंदा शहर प्रतिनिधीश्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ व चेअरमन यांच्या वर होणारे आरोप हे चुकीचे असून, त्यात कोणतेही तथ्य नसल्याच

आमदार निलेश लंके अडचणीत… अधिकाऱ्यांच्या संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार… I LOK News24
Pathardi : अतिवृष्टीने शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त | Lok News24
भाळवणीत अवैध दारूसह 22 लाखाचा मुद्देमाल जप्त

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी
श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ व चेअरमन यांच्या वर होणारे आरोप हे चुकीचे असून, त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे मत, कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी कारखान्याच्या विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले. यावेळी संचालक मंडळ व कारखान्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे राज्यात आगळेवेगळे नाव आहे. आदरणीय बापूंनी कारखान्याचा राज्यभर ठसा उमटवला असून, सभासदांचा विश्वास संपादन केलेला आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र राहून, संचालक मंडळ व सर्व पदाधिकारी काम करीत आहेत. प्रत्येक विषयांत चर्चा, विनिमय करून, आम्ही निर्णय घेतो.

एकतर्फी निर्णय किंवा कोणाला विचारात न घेता निर्णय प्रक्रिया राबवली जात नाही. सभासदांसह कारखान्याला कसा फायदा होईल.? यानुसार निर्णय घेतले जातात. बापूंचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून कामकाज केले जाते. कसलाही बेबनाव या प्रक्रियेत नसल्याचे राजेंद्र नागवडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

याविषयी बोलतांना पुढे ते म्हणाले की, केशव भाऊ मगर व अण्णासाहेब शेलार यांचे सोबत आमचा आपसात कसलाही वाद व संघर्ष झालेला नाही. जेणेकरून आमच्यात वितूष्ट निर्माण होईल. कशामुळे त्यांनी असे निर्णय घेतले.? अजून समजले नाही. तरीही या सर्व प्रक्रियेत विरोधाभास करण्याचं काम ते करतात. कामं करतांना येणाऱ्या अडचणी अनेक असतात, असे नागवडे यांनी यावेळी सांगितले.

केशव भाऊ मगर पदाधिकारी असतांना कारखान्यात क्वचित कामांत उपस्थित राहिले आहेत. त्यांनी कोणत्याही गोष्टींची पाहणी केली नाही. चालू प्रक्रियेत बारकाईने लक्ष दिलेले नाही. कारखाना प्रशासनाच्या कोणत्याही विभागातील अधिकाऱ्यांशी कधीही संवाद साधलेला नाही.

काहीही कारण नसतांना ते कारखान्याची व पदाधिकाऱ्यांची बदनामी करण्याचे काम करत आहेत. हे दुर्दैवी आहे. असे नागवडे यांनी नमूद केले. पारदर्शक कारभारावर आक्षेप घेत, नाहक बदनामी करण्याचे काम त्यांनी चालू केले आहे.

यावेळी पत्रकारांशी बोलतांना नागवडे म्हणाले की, सभासद संचालक मंडळ व या प्रक्रियेतील सर्वांचाच कारखान्याच्या कामावर विश्वास आहे. कारखान्याचे व सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून कारखान्याची बदनामी आता थांबवावी.! असे ते म्हणाले.

कारखाना कामकाज पारदर्शक करत असून, लवकरच शंभर टक्के क्षमतेचा कोजन प्रोजेक्ट चालू करणार आहे. त्याचबरोबर डिस्टिलरी व इतर प्रकल्पही सुरू करण्याचा विचार कारखाना संचालक मंडळ करीत आहे. असेही त्यांनी विशेष नमूद केले.

कारखान्यामध्ये मनमानी कारभार चालू असून, कोजन, मळी, रॉ साखर विक्री, भंगार, पुतळा उभारणीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप बऱ्याच दिवसांपासून होत आहे. ही बदनामी थांबवावी तसेच, कामकाजाचा ऊहापोह व्हावा यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

यावेळी अरुण पाचपुते, सुभाष शिंदे, योगेश भोईटे, विश्वनाथ गिरमकर, युवराज चितळकर, विलास काकडे, हेमंत नलगे, सचिन कदम, श्रीनिवास घाडगे यांचेसह संचालक मंडळातील पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS