Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

उष्णतेची तीव्र लाट लक्षात घेता मुदखेड येथे सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक गोडसे यांच्याकडून गरजूंसाठी छत्री वाटप

मुदखेड : वाढत्या उन्हाचा तडाखा आणि उष्णतेची तीव्र लाट लक्षात घेता, मुदखेड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक कैलास आण्णा गोडसे यांनी सामाज

उष्णतेचा प्रकोप वाढतोय; बीडसह मराठवाड्यात सतर्कतेचे आवाहन – आपत्कालीन मदत कक्ष सज्ज
अहिल्यानगर जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा वाढला; श्रीरामपूर, शिर्डी कोपरगावमध्ये तापमानाने ओलांडली चाळीशी!
लातूर जिल्ह्यात आठवडाभरात उष्माघाताने तीन बळी

मुदखेड : वाढत्या उन्हाचा तडाखा आणि उष्णतेची तीव्र लाट लक्षात घेता, मुदखेड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक कैलास आण्णा गोडसे यांनी सामाजिक बांधिलकी जपत रस्त्याच्या कडेला फळ विक्री करणार्‍या छोट्या व्यापार्‍यांना छत्र्यांचे वाटप केले.
दि. 25 एप्रिल  रोजी पार पडलेल्या या उपक्रमातून कडक उन्हात दिवसभर कष्ट करणार्‍या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. एप्रिल महिन्यात तापमानात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः घराबाहेर काम करणार्‍या कष्टकरी महिला व लघु व्यवसायिकांना उन्हाचा अधिक फटका बसत असल्याचे चित्र आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन  गोडसे यांनी ‘एक हात मदतीचा’ या भावनेतून पुढाकार घेत, उन्हापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने दर्जेदार छत्र्यांचे वितरण केले. त्यांच्या या उपक्रमामुळे गरजू घटकांना प्रत्यक्ष मदत मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. गोडसे यांनी यापूर्वीही शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य शिबिरे आदी विविध सामाजिक उपक्रम राबवून गरजूंच्या मदतीसाठी सतत पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्यामुळे समाजात त्यांच्याबद्दल विश्वास आणि आदर निर्माण झाला आहे. या उपक्रमावेळी नगरसेवक अविनाश चौदंते, मोईन  फुलवाले, मोहम्मद अनीस , विलास मयर आदी उपस्थित होते.

वाढत्या उन्हामुळे महिला भगिनींना होणारा त्रास पाहून हा छोटासा मदतीचा प्रयत्न केला आहे. समाजातील गरजू घटकांसाठी कार्य करणे हे आमचे कर्तव्य असून, भविष्यातही असेच विधायक उपक्रम राबवले जातील.
– कैलास आण्णा गोडसे (माजी नगरसेवक, मुदखेड)

COMMENTS