Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गर्भ पिशवीच्या उपचारासाठी आलेल्या गर्भवतीचा गर्भपात

बुलडाणा प्रतिनिधी - रुग्णालयातील ढिसाळ कारभाराचा फटका रुग्णांना बसल्याची अनेक उदाहरणं नेहमीच चर्चेत असतात. असाच काहीसा धक्कादायक प्रकार बुलढा

माजी नगरसेवक छिंदमविरोधात दोषारोप पत्र दाखल होणार
वैष्णवी चौकात रविवारी जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा
मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर

बुलडाणा प्रतिनिधी – रुग्णालयातील ढिसाळ कारभाराचा फटका रुग्णांना बसल्याची अनेक उदाहरणं नेहमीच चर्चेत असतात. असाच काहीसा धक्कादायक प्रकार बुलढाण्यात समोर आला आहे. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील ढिसाळ काराभाराचा फटका एका सहा महिन्याच्या गर्भवती महिलेला बसला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकारामुळे एका आईचं मातृत्त्व हिरावलं गेलं. रुग्णालयाच्या ढिसाळ कारभारामुळे महिलेचा गर्भपात होऊन तिला आपल्या बाळाला गमवावं लागलं. दरम्यान, धक्कादायक प्रकारानंतर संतप्त नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना धारेवर धरत दोषी आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.                    

बुलढाणा जिल्ह्यातील स्त्री रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सहा महिन्यांच्या गर्भवती महिलेला गर्भ पिशवीला टाके घालण्यासाठी भरती करण्यात आलं होतं. तिचा नैसर्गिक गर्भपात होऊ नये यासाठी या महिलेला उपचार करण्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र महिलेवर गर्भपाताचे उपचार करण्यात आल्यानं तिचा गर्भपात होऊन बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.  बुलढाण्यात राहणाऱ्या सौ. विद्या वाघ या सहा महिन्याच्या गर्भवती होत्या. त्या आपल्या चेकअपसाठी बुलढाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या. त्यावेळी गर्भवती महिलेला जिल्हा स्त्री रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासलं. त्यावेळी डॉक्टरांच्या लक्षात आलं की, महिलेच्या गर्भ पिशवीचं मुख उघडलं असून ते मोठं झालं आहे. त्यामुळे गर्भारपणातील पुढच्या अडचणी टाळण्यासाठी डॉक्टरांनी गर्भ पिशवीला टाके देण्याची गरज असल्याचं सांगितलं. जर टाके घातले नाहीत, तर नैसर्गिक गर्भपाताचा धोका असल्याचंही डॉक्टरांनी गर्भवती महिला आणि तिच्या नातेवाईकांना सांगितलं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, महिला गर्भ पिशवीला टाके देण्यासाठी रुग्णालयात दाखल झाली. अशातच गर्भवती महिलेचा गर्भपात झाला

COMMENTS