Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिलोली पोलीस ठाण्यात शांतता बैठक संपन्न

बिलोली प्रतिनिधी - बिलोली पोलीस ठाण्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त बिलोली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्

14 उपप्रकल्प उभारणीसाठी 21 कोटींचे अनुदान
घराचे कुलूप तोडून सात तोळे सोने, 60 हजार पळविले
सांगली जिल्ह्यातील उमदी येथे आश्रमशाळेतील 170 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा

बिलोली प्रतिनिधी – बिलोली पोलीस ठाण्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त बिलोली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीस बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंता नरोटे  व बिलोली पोलीस  सहाय्यक निरीक्षक आर. एम. केंद्रे  व   मळाले , बिलोली शहरातील सर्व सामाजिक कार्यकर्ते तसेच शहरातील सर्व पत्रकार या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत बिलोली शहरातील सर्व जयंती मंडळाच्या पदाधिकार्‍याची बैठक घेण्यात आली .या बैठकी दरम्यान जयंती मंडळाने पदाधिकार्‍यांनीआपल्या विविध समस्या मांडल्या त्याच अनुषंगाने बिलोली शहरातील पत्रकार या बैठकीस उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी आपल्या मनोगतातून मांडताना शहरातील सर्व अधिकारी म्हणजेच तहसीलदार ,बांधकाम विभाग. वैद्यकीय अधिकारी. वीज वितरण अधिकारी   सर्व अधिकारी शांतता बैठकीला हजर असले पाहिजे  अशा पद्धतीचे मनोगत मांडले जेणेकरून जयंती महोत्सव असो उत्सव असो काही उणिवा असतील तर भरून निघतील अशा विविध समस्यावर चर्चा झाली. त्यानंतर बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंता नरोटे  यांनी आपल्या मनोगततून सर्व सूचनाचे आम्ही विचार करू अशा पद्धतीचा आश्वासन त्यांनी दिले. शेवटी आभार प्रदर्शन सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे आर एम  यांनी आभार मानले.

COMMENTS