Homeताज्या बातम्या

खासदार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधानांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नवी दिल्ली: राजधानीतील राजकीय घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यां

लूटमार करणारी टोळी जेरबंद; पाच आरोपींना अटक, बेलवंडी पोलिसांची धडक कारवाई
सौ. के.एस.के. महाविद्यालयात वनमहोत्सव उत्साहात साजरा; ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमांतर्गत डॉ. दीपाताई क्षीरसागर यांच्या हस्ते वृक्षारोपण
पेपरफुटी ‘सरकार’मुळे तरुणांचे भविष्य धोक्यात; माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरातांचा घणाघात

नवी दिल्ली: राजधानीतील राजकीय घडामोडींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीची छायाचित्रे समोर आल्यानंतर विविध राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, एक दिवस आधीच शरद पवार यांनी जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यामुळे या भेटीचा संबंध त्या आंदोलनाशी आहे का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, विविध पक्षांचे नेते आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांची माहिती घेत आहेत. शरद पवार यांनीही बुधवारी आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. त्यांनी आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांच्या मागण्यांबाबत सहानुभूती व्यक्त केली होती.

यानंतर अवघ्या एका दिवसात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने या बैठकीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ही भेट घेतली असून पंतप्रधान मोदींना शेतकऱ्यांच्या विविध अडचणी आणि हमीभावाबाबत निवेदन दिल्याची माहिती समोर आली आहे.

राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क

जंतर-मंतरवरील आंदोलनामुळे राजधानीतील राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांच्यात झालेल्या भेटीने नव्या चर्चांना चालना दिली आहे. या भेटीत आंदोलनाशी संबंधित विषय, केंद्र-राज्य संबंध किंवा अन्य राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा झाली असावी, असे विविध स्तरांवर बोलले जात असले तरी अधिकृत माहिती समोर येईपर्यंत या सर्व चर्चा केवळ तर्कवितर्कांपुरत्याच मर्यादित राहणार आहेत.

COMMENTS