Homeताज्या बातम्या

31 जुलैपूर्वी खरीप पिक विमा भरा; नवीन नियमांचे पालन करा : अनिल बोर्डे

बीड जिल्ह्यात खरीप हंगाम 2026 साठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू झाली असून पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 आहे. जिल्ह्यातील सर्व शेत

पीक विम्यासाठी संभाजी ब्रिगेडचे महसूल मंडळ पाटोदा येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू
सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी व्हावे नियमांत मोठे बदल;  तालुका कृषी अधिकारी भोरे यांची माहिती
महाराजस्व अभियानातून आपले प्रश्न सोडवून घ्या; आमदार विवेकभैय्या कोल्हे यांचे आवाहन



बीड जिल्ह्यात खरीप हंगाम 2026 साठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरू झाली असून पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी मुदतीपूर्वी पिक विमा भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे बीड जिल्हा उपाध्यक्ष अनिल बोर्डे आणि तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांनी संयुक्तपणे केले आहे.
तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांनी सांगितले की, यंदाच्या खरीप हंगामात पिक विमा योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून शेतकर्‍यांनी नवीन नियमांची माहिती घेऊनच विमा अर्ज भरावा. किमान क्षेत्र: किमान 10 गुंठे क्षेत्रावरील पिकाचा विमा भरता येईल. त्यापेक्षा कमी क्षेत्राचा विमा स्वीकारला जाणार नाही. प्रत्यक्ष पेरणीचे पीक: शेतकर्‍याने प्रत्यक्ष पेरणी केलेल्या पिकाचाच विमा भरावा. चुकीच्या पिकाचा विमा भरल्यास नुकसानभरपाई मिळणार नाही. विमा हप्ता: सोयाबीन पिकासाठी संरक्षित रकमेच्या 2 टक्के, तर कापूस पिकासाठी 5 टक्के हप्ता निश्चित करण्यात आला आहे. डिजिटल प्रक्रिया अनिवार्य: विमा अर्जासाठी फार्मर आयडी आवश्यक असून ई-पीक पाहणी  मोबाईल पद्वारे करणे बंधनकारक आहे.  अधिकार्‍यांनी इशारा दिला आहे की, शासकीय जमीन, गायरान, स्मशानभूमी, तलाव, देवस्थान किंवा इतर अयोग्य जागेवर चुकीची माहिती देऊन विमा भरल्याचे आढळल्यास संबंधित लाभार्थ्याचे आधार कार्ड पाच वर्षांसाठी ब्लॉक करण्यात येऊ शकते. तसेच त्या कालावधीत शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही. अनिल बोर्डे यांनी सर्व शेतकर्‍यांना शेवटच्या दिवसाची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रांसह वेळेत पिक विमा भरून शासनाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

COMMENTS