Homeताज्या बातम्या

शिव, शाहू, फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात शिवसेनेमुळेच भाजपाला जनाधार मिळालाआता त्याच शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न – प्रा. सुशीलाताई मोराळे

ज्येष्ठ नेत्या प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासावर भाष्य करताना अनेक राजकीय घडामोडींवर टी

उपवर्गीकरण रद्द करण्यासाठी रिपाइंराज्यभर लढा उभा करणार:राजू जोगदंड
एससीमधील उपवर्गीकरण रद्द करा; ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी; आंदोलनाचा इशारा
डॉ. आंबेडकरांचे उपकार विसरू नयेत : चौरे 



ज्येष्ठ नेत्या प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासावर भाष्य करताना अनेक राजकीय घडामोडींवर टीका केली. महाराष्ट्रातील पुरोगामी विचारसरणी, डाव्या चळवळींचा प्रभाव आणि त्यानंतर झालेल्या राजकीय बदलांचा आढावा घेत त्यांनी, शिव, शाहू, फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या महाराष्ट्रात भाजपाला ग्रामीण जनाधार मिळवून देण्यात शिवसेनेची मोठी भूमिका राहिली. मात्र, आज त्याच शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप केला.
प्रा. मोराळे म्हणाल्या की, महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुरोगामी विचारांची भूमी आहे. एकेकाळी राज्यात डाव्या विचारसरणीचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर होता. कम्युनिस्ट, समाजवादी आणि शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवला होता. पुढे राजकीय परिस्थिती बदलत गेली आणि डाव्या चळवळींना रोखण्यासाठी काँग्रेसच्या पाठबळातून शिवसेना बळकट झाली, असा दावा त्यांनी केला. त्यांच्या मते, 1995 मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपाला ग्रामीण महाराष्ट्रात विस्तार करण्याची मोठी संधी मिळाली. यापूर्वी भाजपाची प्रतिमा प्रामुख्याने शहरी आणि मर्यादित मतदारांपुरती होती. शिवसेनेच्या सहकार्यामुळे भाजपाने राज्यभर आपला प्रभाव वाढवला, असे त्या म्हणाल्या. प्रा. मोराळे यांनी आणीबाणी, जनता पक्षाची स्थापना, त्यानंतर भारतीय जनता पक्षाची निर्मिती आणि पुढील राजकीय घडामोडींचा संदर्भ देत समाजवादी व जनसंघातील नेत्यांच्या एकत्र येण्याची पार्श्वभूमी मांडली. त्यांच्या मते, काँग्रेसविरोधी राजकारणामुळे भाजपाला बळ मिळाले आणि पुढे त्या पक्षाने स्वतःचा प्रभाव वाढवत मित्रपक्षांनाही कमकुवत केले. भाजपावर टीका करताना त्यांनी पक्षावर भ्रष्टाचारविरोधी आणि घराणेशाहीविरोधी भूमिका केवळ घोषणांपुरती असल्याचा आरोप केला. तसेच अनेक विरोधी पक्षांतील नेत्यांना पक्षात प्रवेश देणे, मित्रपक्षांचे राजकीय अस्तित्व कमकुवत करणे आणि सत्तेसाठी विविध राजकीय डावपेच राबविणे, अशीही टीका त्यांनी केली. आरक्षण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मंडल आयोग, रामजन्मभूमी आंदोलन, बाबरी मशीद पाडण्याची घटना, केंद्रातील सत्तांतर आणि 2014 नंतरच्या राजकीय घडामोडींचा उल्लेख करत त्यांनी भाजपाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लोकसभा निवडणुकांनंतर विविध केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधी पक्षांमध्ये फूट पाडली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच मतदारसंघ पुनर्रचना, समान नागरी कायदा आणि संविधानातील संभाव्य बदलांच्या मुद्द्यांवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. ज्या शिवसेनेच्या बळावर भाजपाने महाराष्ट्रात जनाधार निर्माण केला, त्याच शिवसेनेला आज राजकीयदृष्ट्या संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप करत प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी महाराष्ट्रातील पुरोगामी विचारसरणी जपण्यासाठी जनतेने सजग राहण्याचे आवाहन केले.

COMMENTS