Homeताज्या बातम्या

गोरेगाव-मुलूंड लिंक रोडचा मार्ग मोकळा; बीएमसीची कडक बंदोबस्तात पाडकाम मोहीम, १५० बांधकामे हटवली

मुंबई : गोरेगाव-मुलूंड लिंक रोड प्रकल्पासाठी आवश्यक जागा मोकळी करण्याच्या कामाला महानगरपालिकेकडून वेग आला आहे. त्याअंतर्गत रविवार, दि. ३१ मे रोजी

मुंबईत सीएनजीच्या दरात पुन्हा २ रुपयांची वाढ; १५ दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ, पीएनजीही ५० पैशांनी महागला
एसटी प्रवाशांना दरवाढीचे संकेत; डिझेल दरवाढीमुळे ३१० कोटींच्या खर्चात वाढ
ओबीसी आरक्षणावर गदा? राज्य निवडणूक आयोगाचे नवे आदेश; ५० टक्क्यांच्या मर्यादेमुळे जागा कमी होणार
अनधिकृत बांधकामे, झोपड्यांवर कारवाई! गोरेगाव-मुलुंड जोडरस्त्यासाठी पालिकेने  १५० झोपड्यांवर फिरवला बुलडोझर Mumbai Marathi News | Action against  unauthorized ...

मुंबई : गोरेगाव-मुलूंड लिंक रोड प्रकल्पासाठी आवश्यक जागा मोकळी करण्याच्या कामाला महानगरपालिकेकडून वेग आला आहे. त्याअंतर्गत रविवार, दि. ३१ मे रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुलूंडमधील खिंडीपाडा परिसरातील अमरनगर येथे मोठी कारवाई केली. या पाडकाम मोहिमेत सुमारे १५० अनधिकृत निवासी आणि व्यावसायिक बांधकामांवर हातोडा पडला आहे. ही कारवाई ‘टी’ वॉर्डच्या अतिक्रमण तोडक पथकाने केली. गोरेगाव-मुलूंड लिंक रोड प्रकल्पाच्या मार्गात येणारी व अडथळा ठरणारी अनधिकृत बांधकामे हटवण्याचे काम सध्या सुरू आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गासाठी जागा उपलब्ध करून देणे हा या कारवाईमागील उद्देश असल्याचे महानगरपालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाडलेली बांधकामे ही प्रकल्पाच्या निश्चित मार्गात येत होती, त्यामुळे ती हटवणे आवश्यक होते. या भागात अद्याप २३४ अनधिकृत बांधकामे शिल्लक आहेत. त्यांच्यावरही पुढील आठवड्यात कारवाई केली जाणार आहे. या मोहिमेचा पुढील टप्पा लवकरच राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पोलीस बंदोबस्तात कारवाई: झोन ६ च्या उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. ‘टी’ वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांनी या कारवाईचे नेतृत्व केले. कारवाईदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुलूंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

प्रवास जलद होणार, कोंडी कमी होणार: गोरेगाव-मुलूंड लिंक रोड हा मुंबईतील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक मानला जातो. या प्रकल्पामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील प्रवास अधिक जलद होणार आहे, तसेच वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. शहरातील वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात असून त्यासाठी आवश्यक कामांना महानगरपालिकेकडून गती दिली जात आहे.

COMMENTS