Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांचा उपरोधिक सवाल; नगरसेवक अ‍ॅड. महेश कनकदंडे यांना नागरिकांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे नाही, नेटवर्क नाही की नेतेच नाहीत?

नांदेड : नांदेड महानगरपालिकेतील सभागृह नेते ड. महेश कनकदंडे यांचा मोबाईल क्रमांक सध्या नागरिकांसाठी एक कोडे बनला आहे. फोन लावा तर उत्तर एकच - ‘नॉ

नांदेड शहरात सिग्नलच्या जवळ ग्रीन मॅट लावण्याची मागणी
रस्ता काँक्रिटीकरणाची मागणी;नगरसेविका दीपाली बंग यांचे निवेदन; सत्याग्रहाचा इशारा
अकोलेसाठी ‘शीत शव पेटी’ची मोफत सुविधा; रोटरी क्लब अकोले सेंट्रलचा उपक्रम; ग्रामीण रुग्णालयाकडे सुपूर्द
NANDED WAGHALA CITY MUNICIPAL CORPORATION, NANDED

नांदेड : नांदेड महानगरपालिकेतील सभागृह नेते ड. महेश कनकदंडे यांचा मोबाईल क्रमांक सध्या नागरिकांसाठी एक कोडे बनला आहे. फोन लावा तर उत्तर एकच – ‘नॉट रिचेबल’! त्यामुळे प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिकांनी आता वीज, पाणी आणि नागरी समस्यांपेक्षा नेते कुठे आहेत? हा नवा प्रश्न हातात घेतला आहे.
मागील तीन दिवसांपासून परिसरात वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कधी लाईट जाते, कधी येते, कधी फक्त आश्वासनच येते. उकाड्यामुळे घरातील ज्येष्ठ नागरिक त्रस्त, महिला संतप्त आणि विद्यार्थ्यांची परीक्षा अंधारात सुरू आहे. काहींनी तर मोबाईलच्या टॉर्चवर अभ्यास करून डिजिटल इंडियाचा अनुभव घेतल्याची उपरोधिक प्रतिक्रिया दिली. पाणीपुरवठ्याची स्थितीही वेगळी नाही. नळाला पाणी येते, पण दाब इतका कमी की बादलीपेक्षा संयम भरायला जास्त वेळ लागतो. अशा वेळी नागरिकांनी आपल्या लोकप्रतिनिधींना फोन करण्याचा प्रयत्न केला; पण फोनवरून जणू एकच संदेश – कृपया नंतर प्रयत्न करा, नेते सध्या जनतेपासून दूर आहेत. सभागृह नेते हे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा मानले जातात. पण येथे दुवा तर दूरच, नेटवर्कच सापडत नसल्याची चर्चा आहे. काही नागरिकांनी विनोदाने सांगितले की, महापालिकेने आता वीजपुरवठ्याबरोबर सभागृह नेत्यांचे लोकेशन अपडेटही द्यावे. विशेष म्हणजे कनकदंडे हे विविध प्रभागांतून निवडणुका जिंकण्याच्या राजकीय कौशल्यासाठी ओळखले जातात. ज्या वेगाने ते प्रभाग बदलतात, त्याच वेगाने फोनचे नेटवर्कही बदलत असावे, असा टोला कार्यकर्त्यांनी लगावला आहे. मागील निवडणुकीतही नागरिकांशी संपर्क कमी असल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. मात्र पक्षाने त्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा संधी दिली. आता जनतेचे म्हणणे असे – उमेदवारी मिळाली, पण उपलब्धता हरवली. निवडणुकीच्या काळात घराघरांत जाऊन मतांची बेल वाजवणारे नेते, निवडून आल्यानंतर फोनची बेलही उचलत नसतील, तर हा लोकशाहीतील नवा प्रयोग मानावा लागेल. प्रभागात आता चर्चा रंगली आहे की, पुढील निवडणुकीत जर मतदारांनीच ‘नॉट रिचेबल’ मोड सुरू केला, तर आश्चर्य वाटू नये.

COMMENTS