Homeताज्या बातम्या

बीडमधील बनावट ट्रस्टचे पाकिस्तानी कनेक्शन उघड; ४ कोटी ७३ लाखांचा संशयास्पद निधी एटीएसच्या तपासात उघडकीस

बीड: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) तपासात बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील 'गुलजार-ए-रजा' या बनावट ट्रस्टचे कथित पाकिस्तानी कनेक्शन समोर

नांदेडमधील कोचिंग क्लासेस सुरक्षित आहेत का? लखनऊ दुर्घटनेनंतर अभ्यासिका आणि शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
अरणगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; १९ ते २६ जुलै दरम्यान रंगणार धार्मिक सोहळा
कट्टा दाखवून मॅनेजरला कोंडले; टाकळीभान येथील देशी दारू दुकानात पावणेदोन लाखांची लूट
बीडच्या बनावट ट्रस्टचे पाकिस्तानी कनेक्शन? किती पैसे जमा? ATS च्या तपासात  धक्कादायक माहिती | महाराष्ट्र बातम्या - News18 Marathi

बीड: महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) तपासात बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील ‘गुलजार-ए-रजा’ या बनावट ट्रस्टचे कथित पाकिस्तानी कनेक्शन समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर एटीएसच्या बीड युनिटने काही महिन्यांपूर्वी माजलगाव येथे या बनावट ट्रस्टचा भंडाफोड केला होता.

या संस्थेने ५ वेगवेगळ्या बँक खात्यांद्वारे तब्बल ४ कोटी ७३ लाख रुपयांची देणगी जमा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या बनावट ट्रस्टचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील ‘अल हलिमी’ या दुसऱ्या एका बनावट ट्रस्टशी थेट आर्थिक संबंध असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले असून, सुरक्षा यंत्रणांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील दहशतवाद विरोधी पथकाच्या बीड विभागाने काही महिन्यांपूर्वी माजलगाव येथे कारवाई करून ‘गुलजार-ए-रजा’ नावाने कार्यरत असलेल्या कथित बनावट विश्वस्त संस्थेचा पर्दाफाश केला होता. प्राथमिक चौकशीत या संस्थेचे बार्शी येथील ‘अल हलिमी’ नावाच्या कथित बनावट विश्वस्त संस्थेशी थेट आर्थिक व्यवहार झाल्याचे आढळले आहे.

यापूर्वी या संस्थेनेही सुमारे १० कोटी रुपयांचा निधी विविध मार्गांनी जमा केल्याची माहिती तपासात समोर आली होती. त्यामुळे दोन्ही संस्थांमधील निधीची देवाणघेवाण, आर्थिक साखळी आणि त्यामागील मूळ उद्देश यांचा सुरक्षा यंत्रणांकडून बारकाईने मागोवा घेतला जात आहे.

COMMENTS