Homeताज्या बातम्या

पैठण हादरले; पतीने केली पत्नीची कुऱ्हाडीने हत्या; आरोपी स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात; हत्येचे कारण अस्पष्ट

पैठण : पैठण शहरातील संत ज्ञानेश्वर उद्यान परिसरात बुधवारी सकाळी एका महिलेची तिच्याच पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकी

घाटघर परिसरातील उंबरदरा येथे अज्ञात व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळल्याने खळबळ; ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान
फूल देत दिला निर्वाणीचा इशारा; आता अतिक्रमण केल्यास थेट कायदेशीर कारवाई!
अहिल्यानगरमध्ये २७ मे पासून मान्सूनपूर्व पावसाचे आगमन; हवामान अभ्यासक उत्तमराव निर्मळ यांचा अंदाज
Paithan Husband Kills Wife With Axe Near Sant Dnyaneshwar Garden

पैठण : पैठण शहरातील संत ज्ञानेश्वर उद्यान परिसरात बुधवारी सकाळी एका महिलेची तिच्याच पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. घटनेनंतर आरोपी पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून हत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. मंदाबाई सुरेश अंगारखे (वय ४५, रा. गांगलवाडी, नारळा, पैठण) असे मृत महिलेचे नाव आहे. तर सुरेश अंगारखे असे आरोपी पतीचे नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पती-पत्नी बुधवारी सकाळी संत ज्ञानेश्वर उद्यान परिसरातील झाडीच्या भागात सरपणासाठी लाकूड गोळा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपीने सोबत असलेल्या कुऱ्हाडीने पत्नीवर हल्ला केला. डोक्यासह शरीराच्या विविध भागांवर करण्यात आलेल्या वारांमुळे मंदाबाई अंगारखे गंभीर जखमी झाल्या. अतिरक्तस्रावामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपी सुरेश अंगारखे थेट पैठण पोलीस ठाण्यात गेला. तेथे त्याने पत्नीची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून हल्ल्यात वापरलेली कुऱ्हाड जप्त करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळावरील पुरावे संकलित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. आरोपीने पत्नीची हत्या कोणत्या कारणामुळे केली, याबाबात अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. कौटुंबिक वाद, वैयक्तिक कारणे किंवा इतर कोणत्या कारणातून हा प्रकार घडला का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

COMMENTS