अहिल्यानगर : जिल्ह्यात २७ ते ३१ मे दरम्यान मान्सूनपूर्व (वळवाच्या) पावसाचे जोरदार आगमन होणार आहे, तर ७ ते १० जूनच्या दरम्यान नियमित मान्सून जिल्ह

अहिल्यानगर : जिल्ह्यात २७ ते ३१ मे दरम्यान मान्सूनपूर्व (वळवाच्या) पावसाचे जोरदार आगमन होणार आहे, तर ७ ते १० जूनच्या दरम्यान नियमित मान्सून जिल्ह्यात दाखल होईल, असा अंदाज जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता तथा हवामान अभ्यासक उत्तमराव निर्मळ यांनी व्यक्त केला आहे.
यावर्षी नैऋत्य मौसमी पावसासाठी परिस्थिती अत्यंत अनुकूल असल्याने मान्सून २५ मे पर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याची पुढील वाटचाल जलद गतीने होऊन तो २ जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या दक्षिण भागात तसेच कोकणात धडकेल.
अहिल्यानगर जिल्ह्यात २६ मे पर्यंत ढगाळ हवामानात वाढ होत जाऊन हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढेल. जिल्ह्याच्या उत्तर आणि दक्षिण भागात काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या स्वरूपात पाऊस पडेल. त्यानंतर २७ ते ३१ मे दरम्यान बहुतांश भागात मान्सूनपूर्व पावसाची चांगली हजेरी लागेल. १ ते ६ जूनच्या दरम्यान तापमानात लक्षणीय घट होऊन नियमित मान्सूनची चाहूल लागेल. जिल्ह्यात १० ते २० जूनच्या दरम्यान पेरणीयोग्य सर्वदूर पाऊस होईल, ज्यामुळे यावर्षी खरीप पिकांसाठी परिस्थिती अनुकूल राहील, असेही निर्मळ यांनी सांगितले.

COMMENTS