Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजलगाव नगरपालिका 10 दिवसांपासून बंद

बीड : मराठा आरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान आंनदोलकांनी अनेक ठिकाणी तोडफोड व जाळपोळ केली होती. यात बीड जिल्ह्यातील माजलगाव नगरपालिके

क्रिकेट च्या धुंदीत का गुंतलात ?
मुंबईत महिलांवरील गुन्ह्यांमध्ये 11 टक्क्यांनी वाढ
पर्यावरण व वातावरणीय बदल योजनांचा आराखडा तयार करा : मंत्री पंकजा मुंडे यांचे निर्देश

बीड : मराठा आरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान आंनदोलकांनी अनेक ठिकाणी तोडफोड व जाळपोळ केली होती. यात बीड जिल्ह्यातील माजलगाव नगरपालिकेत देखील जाळपोळ झाली होती. तेव्हापासून म्हणजे मागील 10 दिवसांपासून नगरपरिषदेचे कामकाज अजूनही बंदच आहे. परिणामी सर्व कामे रखडलेली आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्यावतीने राज्यभरात आंदोलन उभारण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान माजलगाव नगरपालिका कार्यालय देखील पेटविले होते. या घटनेला 10 दिवस उलटले असून यानंतर अद्याप येथील कामकाज नव्याने सुरु झालेले नाही.

COMMENTS