शेवगाव : देशाची राजधानी दिल्ली येथे नुकत्याच प पडलेल्या ‘६९ व्या नॅशनल स्कूल गेम्स २०२५-२६’ स्पर्धेत शेवगावच्या कर्मयोगी आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा खेळाडू विराज धोंडे याने उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. या यशामुळे शेवगाव तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. दिल्ली सरकारच्या शिक्षण व क्रीडा संचालनालयामार्फत आयोजित या राष्ट्रीय स्पर्धा १६ ते २२ एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडल्या. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना विराज धोंडे याने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना चुरशीची लढत देत कांस्यपदकाची कमाई केली.याच स्पर्धेत विद्यालयाचा दुसरा खेळाडू समर्थ दुसुंगे यानेही महाराष्ट्र संघातून सहभाग नोंदवत प्रभावी खेळ सादर केला. त्याच्या कामगिरीमुळे राष्ट्रीय स्तरावर सर्वांचे लक्ष वेधले गेले. या दोन्ही खेळाडूंच्या यशामुळे विद्यालयासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.या यशाबद्दल अहिल्यानगर जिल्हा बेसबॉल संघटनेचे अध्यक्ष अरुण चंद्रे, उपाध्यक्ष सुधीर चापळगावकर तसेच सचिव मकरंद कोऱ्हाळकर यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. खेळाडूंना क्रीडा शिक्षक कल्पेश भागवत, संतोष ढोले, सचिन वाल्हेकर, विक्रम घुटे आणि वैष्णवी फलके यांचे मार्गदर्शन लाभले.“विराज धोंडे याने मिळवलेले कांस्यपदक आणि समर्थ दुसुंगे याचा राष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. दोन्ही खेळाडूंनी संस्थेचे व जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.”-ऍड. डॉ. विद्याधर काकडे, अध्यक्ष, कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह, शेवगाव.

COMMENTS