Homeताज्या बातम्या

कर्तव्यदक्ष अतिरिक्त पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांचा मातृभूमी प्रतिष्ठानकडून गौरव

बीड: कर्तव्यनिष्ठा, कार्यतत्परता, लोकाभिमुख प्रशासन आणि प्रभावी कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक, अ

तुलसी इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा! विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
निर्भिड सामाजिक योद्धा राज्यस्तरीय पुरस्काराने डॉ. गणेश ढवळे सन्मानित; बीडमध्ये भव्य सोहळ्यात गौरव
ऊसतोड कामगारांची नोंदणी तातडीने आणि अचूकपणे पूर्ण करावी – आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे; जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे गट विकास अधिकार्‍यांना आदेश

बीड: कर्तव्यनिष्ठा, कार्यतत्परता, लोकाभिमुख प्रशासन आणि प्रभावी कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अतिरिक्त पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई तथा प्रभारी पोलीस अधीक्षक, बीड चेतना तिडके यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. मातृभूमी प्रतिष्ठान (बीड), लेक लाडकी अभियान (बीड जिल्हा) आणि महा एनजीओ फेडरेशन (महाराष्ट्र राज्य) यांच्या संयुक्त विद्यमाने हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात चेतना तिडके यांना शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, महिलांच्या संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे आणि लोकाभिमुख पोलीस प्रशासन उभे करण्यासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले आहे.

याप्रसंगी मराठवाडा शिक्षक संघाचे मार्गदर्शक प्राचार्य डी. जी. तांदळे, मातृभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय तांदळे, लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्याचे बीड जिल्हा समन्वयक बाजीराव नवनाथ ढाकणे, ज्येष्ठ नागरिक सुधीर देशमुख, किशोर कुलकर्णी, शाम मार्कंडे, शेख पाशा, नितीन जायभाये यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक व स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

हा गौरव संपूर्ण पोलीस दलाचा: चेतना तिडके

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी चेतना तिडके यांच्या प्रामाणिक, संवेदनशील आणि लोककेंद्रित कार्यपद्धतीचे भरभरून कौतुक केले. पोलीस प्रशासन आणि समाज यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करण्यासाठी अशा अधिकाऱ्यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या सन्मानाला उत्तर देताना, “हा गौरव माझा एकटीचा नसून संपूर्ण पोलीस दलाचा आहे,” असे चेतना तिडके यांनी नमूद केले. तसेच, नागरिकांच्या सहकार्यामुळेच कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखता येते, असे सांगत समाजहितासाठी पोलीस प्रशासन भविष्यातही तत्परतेने कार्यरत राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

COMMENTS