Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विरोधकांकडून केवळ परिवारांचा विकास

पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल महायुतीचा चंद्रपुरातून प्रचार सुरू

चंद्रपूर ः देशामध्ये आमच्या भाजप आणि एनडीए सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले असतांना, दुसरीकडे काँगे्रस आणि त्यांची आघाडी केवळ सत्ता भोगा आणि

घराणेशाहीमुळे काँग्रेसचे दुकान बंद होण्याची वेळ
शेतकर्‍यांसाठी शरद पवारांनी काय केलं ?  
काँग्रेसला आपल्याच नेत्यांची गॅरंटी नाही

चंद्रपूर ः देशामध्ये आमच्या भाजप आणि एनडीए सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले असतांना, दुसरीकडे काँगे्रस आणि त्यांची आघाडी केवळ सत्ता भोगा आणि मलई खा, हेच त्यांचे ध्येय असल्याची बोचरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. काँगे्रसच्या काळात महाराष्ट्राची उपेक्षाच झाली असून, विरोधकांकडून आपल्या परिवारांचा विकास करण्यात येत असल्याचा हल्लाबोल यावेळी मोदी यांनी केला. सोमवारी चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींनी पहिली सभा घेत प्रचाराचा नारळ फोडला. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, बाळासाहेबांची शिवसेना पुढे नेण्याचे काम एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी करत आहेत. काँग्रेससोबत नकली शिवसेना आहे, असे म्हणत मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तर काँग्रेससह इंडिया आघाडीतील पक्षांनी केवळ परिवारांचा विकास केला आहे, त्यांना देशाशी देणघेणे नाही. काँग्रेस म्हणजे कारल्यासारखे आहे. ते कधीच सुधरू शकत नाही, असा हल्लाबोल मोदींनी काँग्रेसवर केला. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील विदर्भातील महायुतीचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, गडचिरोलीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चंद्रपूरात सभा पार पडली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. पंतप्रधान मोदी यावेळी बोलतांना म्हणाले की, लोकसभा 2024 ची निवडणूक ही स्थिरता विरुद्ध अस्थिरता याच्यामधली आहे. एकीकडे भाजपप्रणित एनडीए आहे. या एनडीएचे ध्येय हे देशासाठी मोठे निर्णय घेण्याचे आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि इंडिया आघाडी आहे, त्यांचा मंत्र आहे की, जिथे सत्ता मिळेल तिथे खूप मलाई खावी. इंडिया आघाडी नेहमी देशाला अस्थितरतेकडे नेलं आहे. एका स्थिर सरकारची आवश्यकता किती आहे हे महाराष्ट्राशिवाय कोण सांगू शकेल, असेही मोदी म्हणाले. काश्मीरी पंडीतांचे घरे जाळले जात होते, तेव्हा बाळासाहेब ठाकरे पुढे आले. तेव्हा त्यांनी असे म्हटले नाही की, काश्मीरमध्ये घडले मग महाराष्ट्रात का बोलायचे. मला अभिमान आहे की, एकनाथ शिंदे व त्यांची पार्टी बाळासाहेबांच्या विचारांना पुढे घेऊन चालली आहे. काँग्रेससोबत सद्या नकली शिवसेना आहे, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी उद्वव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

COMMENTS