Homeताज्या बातम्यादेश

कुनो पार्कमधील 11 चित्ते हलवले बंदिस्त ठिकाणी

नामिबिया-दक्षिण आफ्रिकन तज्ज्ञ करणार तपासणी

श्योपूर/वृत्तसंस्था ः भारतातून चित्त्या या प्राण्यांचा अधिवास नष्ट झाल्यानंतर मोदी सरकारने नामिबिया या देशातून चित्ते आणत त्यांचे पुर्नजीवन करण्य

के सी  आर यांच्या बी आर एस चा बीड येथे कार्यकर्ता मेळावा संपन्न
विद्यार्थ्यांने पेटवून दिल्यामुळे महिला प्राचार्याचा मृत्यू
दिव्यांगांना साहित्य वाटप नाव नोंदणी शिबिराचा आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते शनिवारी शुभारंभ

श्योपूर/वृत्तसंस्था ः भारतातून चित्त्या या प्राण्यांचा अधिवास नष्ट झाल्यानंतर मोदी सरकारने नामिबिया या देशातून चित्ते आणत त्यांचे पुर्नजीवन करण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र श्योपूरच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांच्या सततच्या मृत्यूमुळे व्यवस्थापन चिंतेत आहे. मोकळ्या जंगलात फिरणार्‍या सर्व चित्त्यांना ट्रँकुलाइझ करून एकामागून एक मोठ्या बंदिस्तात हलवले जात आहे. आतापर्यंत 11 चित्त्यांना मोठ्या बंदिवासात आणण्यात आले आहे. नामिबिया-दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञ आणि वनविभागाची टीम त्यांची वैद्यकीय तपासणी करत आहे.
6 चित्त्यांचा रेडिओ कॉलर आयडीही काढून टाकण्यात आला आहे. तज्ज्ञांच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, पावक चित्त्याला शनिवारी (22 जुलै) मोठ्या वाड्यात आणण्यात आले. प्राथमिक तपासणीत तो पूर्णपणे निरोगी असल्याचे निष्पन्न झाले. सध्या त्याला मोठ्या वाड्यात ठेवण्यात येणार आहे. विभागीय वन अधिकारी (डीएफओ) प्रकाश वर्मा यांनी रविवारी (23 जुलै) एक प्रेस नोट जारी करून ही माहिती दिली. कुनो नॅशनल पार्कच्या मोठ्या परिसरात 6 नर आणि 5 मादी असे एकूण 11 चित्ते असल्याची नोंद आहे. उर्वरित 4 चित्ते खुल्या जंगलात आहेत. एका पिल्लाला वेगळे ठेवण्यात आले आहे. त्यांचीही एक एक करून आरोग्य तपासणी केली जाईल. तीन चित्तांच्या मानेला जखमा आणि संसर्ग झाला होता. कुनो व्यवस्थापनाने या संसर्गाचे कारण रेडिओ कॉलर आयडी असू शकते अशी भीती व्यक्त केली होती. यामुळे आता 6 चित्त्यांचा कॉलर आयडी काढून टाकण्यात आला आहे. उर्वरित चित्त्यांचे कॉलर आयडी काढण्याचाही विचार सुरू आहे. डीएफओ प्रकाश वर्मा यांनी सांगितले की, सध्या कुनो नॅशनल पार्कमधून काही चित्ते राजस्थानमध्ये हलवण्याची कोणतीही योजना नाही. याबाबत वरिष्ठ अधिकारीच काही सांगू शकतील. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने कुनो येथील चित्त्यांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली आहे. न्यायालयाने गुरुवारी (20 जुलै) केंद्र सरकारला सांगितले की, कुनो येथील काही चित्त्यांना राजस्थानला हलवण्याचा विचार केला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, ’आफ्रिका-नामिबियातून आणलेल्या 40 टक्के चित्तांचा मृत्यू झाला आहे. त्यांना भारतात आणून एक वर्षही उलटले नाही. मृत्यूची ही आकडेवारी चांगली नाही. केंद्राच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) ऐश्‍वर्या भाटी न्यायालयात हजर झाल्या होत्या.

COMMENTS