Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जेजुरी गडावर भाविकांची अलोट गर्दी

श्री खंडोबा देवाची सोमवती यात्रेला सुरूवात

पुणे ः महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबा देवाची सोमवती यात्रेला सुरुवात झाली. देवाचा पालखी सोहळा कर्‍हा स्नानासाठी जेजुरी गडावरून करा

अवकाळी पावसामुळे घरावर वीज कोसळून घराचे मोठे नुकसान
मुलींच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर
कोळकेवाडी दूर्ग : किल्ल्यावर चढाई करताना एक वेगळाच अनुभव

पुणे ः महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबा देवाची सोमवती यात्रेला सुरुवात झाली. देवाचा पालखी सोहळा कर्‍हा स्नानासाठी जेजुरी गडावरून करा नदीकडे मार्गस्थ झाला आहे. येळकोट येळकोट जय मल्हार ! असा जयघोष करीत भाविकांनी भंडार्‍याचे उधळण केली. यावेळी संपूर्ण जेजुरीगड भंडार्‍याने न्हावून निघाला होता.
सोमवती या दिवशी पर्व काळाची संधी असल्याने जेजुरी गडावरून खंडोबा देवाचा पालखी सोहळा कर्‍हा नदीवर प्रस्थान ठेवत असतो. मंदिर प्रदक्षणीनंतर श्री खंडोबा व म्हाळसा देवीची उत्सव मूर्ती पालखीत ठेवण्यात आली. गडावरून सोहळा निघताच हजारो भाविकांनी देवाचे लेन असणार्‍या पिवळा गर्द भंडार्‍याची उधळण करीत खंडेरायाचा जयघोष केला. यावेळी देवस्थान विश्‍वस्तांस शहरातील अठरापगड जाती धर्मातील समाजबांधव ग्रामस्थ पुजारी, सेवेकरी, मानकरी, खांदेकरी यांनी हा सोहळा याची डोळा याची देहा अनुभवला. कर्‍हा नदीवरील रंभाई शिंपीन या ठिकाणी श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्तींना सायंकाळी पाच वाजता कर्‍हा नदीच्या पाण्याने व पंचामृताने स्नान घालून समाज आरती होईल.

COMMENTS