Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांसाठी शरद पवारांनी काय केलं ?  

शिर्डीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

अहमदनगर ः महाराष्ट्रातील एका नेत्याने शेतकर्‍यांच्या जीवावर उभी ह्यात राजकारण केले, पण त्यांनी शेतकर्‍यांसाठी काय केल?  मी पवारांचा वैयक्तिक सन्म

विरोधकांकडून केवळ परिवारांचा विकास
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ?
भारत सेमी कंडक्टरमुळे ग्लोबल हब बनेल

अहमदनगर ः महाराष्ट्रातील एका नेत्याने शेतकर्‍यांच्या जीवावर उभी ह्यात राजकारण केले, पण त्यांनी शेतकर्‍यांसाठी काय केल?  मी पवारांचा वैयक्तिक सन्मान करतो, पण शेतकर्‍यांसाठी काय केलं? आम्ही सच्च्या मनाने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या सन्मानासाठी काम करतोय, पण महाराष्ट्रातील एका नेत्यांने शेतकर्‍यांच्या नावाखाली केवळ राजकारण केले अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी शिर्डी दौर्‍यावर होते. यावेळी त्यांनी साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी मोदींच्या हस्ते साईबाबांची पाद्यपूजा आणि आरती करण्यात आली. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार उपस्थित होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते निळवंडे प्रकल्पासह, शिर्डीतील विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. यानंतर पंतप्रधान यांनी शेतकरी सभेला संबोधित करतांना त्यांनी ही टीका केली.

यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 60 वर्षांच्या कार्यकाळात शरद पवारांनी देशभरातील शेतकर्‍यांकडून साडेतीन लाख कोटी रुपयांच्या एमएसपीवर अन्नधान्य खरेदी केले. दुसरीकडे आमच्या सरकारने सात वर्षांच्या काळात साडेतेरा लाख कोटी रुपये शेतकर्‍यांना दिले आहेत. 2014 च्या पूर्वी शेतकर्‍यांच्या मालाची 500 ते 600 कोटी रुपयांची एमएसपीवर खरेदी व्हायची, आमच्या सरकारने 1 लाख 15 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केले आहेत, असे ते म्हणाले. ’2014 च्या आधी महाराष्ट्रातील एक नेते अनेक वेळा राज्याचे कृषिमंत्री राहून गेले. मात्र त्या काळात शेतकर्‍यांचे मोठे हाल होते. शेतकर्‍यांसाठी कुठलीच योजना काम करत नव्हती. शेतकर्‍यांना अनेकदा हेलपाटी मारावे लागत होते. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे नाव फक्त राजकारणासाठी वापरले गेले, मात्र 2014 नंतर हे चित्र बदलले. आपल्या सरकारने शेतकर्‍यांच्या सशक्तीकरणासाठी काम केले, असा सांगता पंतप्रधान मोदी यांनी अजित पवार यांच्यासमोरच शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.    

पंतप्रधान मोदींच्या हाताला यशाचे परीस ः मुख्यमंत्री शिंदे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्यावर्षभरात सरकार स्थापन झाल्यानंतर पंतप्रधान महाराष्ट्रात सहावेळा आहे. आपण निमंत्रण दिले आणि त्यांनी त्याचा स्वीकार केला, हा त्यांचा मोठेपणा आहे. म्हणून, आतापर्यंत 2 लाख कोटींच्या कामांंचे भूमिपूजन आणि लोकार्पण झालं आहे. आजही 14 हजार कोटींपेक्षा जास्त कामांचे लोकार्पण होते. निळवंडे धरणाचा इतिहास प्रत्येकाला माहित आहे. देवेंद्रजींनी सांगितले की त्यांच्या जन्माआधी हा प्रकल्प सुरू झाला, परंतु, मधे काय काय झाले त्या इतिहासात जाऊ इच्छित नाही. देवेंद्र मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी या प्रकल्पाला चालना दिली. या प्रकल्पामुळे 68 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे, अशी माहितीही त्यांनी आज दिली.

महाराष्ट्राचा विकास झाला तर, देशाचा विकास- महाराष्ट्रामध्ये खूप शक्ती आहे. महाराष्ट्राचा विकास झाला तरच देशाचा विकास होणार आहे. राज्यामध्ये अनेक विकासकामे सुरु झाले आहेत. अनेक विकास कामे पूर्ण झाले आहेत. याचा फायदा शेतकर्‍यांना होणार आहे. ट्रान्सपोर्ट सेवेसंबंधी अनेक प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. भारताला आपल्याला विकसित राष्ट्र करायचे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

निळवंडेच्या डाव्या कालव्याचे लोकार्पण – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरूवारी अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या पहिल्या आणि डाव्या कालव्याचे अखेर जलपूजन करून लोकार्पण करण्यात आले. जिल्ह्यासाठी महत्त्वाचा असलेला आणि मागच्या अनेक वर्षांपासून बहुतर्चीत असलेल्या या प्रकल्पाच्या कालव्यातून  191 क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे.  प्रवरा नदीवर असलेल्या अकोले तालुक्यातील निळवंडे धरणावरील कालव्याचा प्रकल्प मागच्या अनेक वर्षांपासून रखडला होता. 85 किलोमीटरचा डावा कालवा आणि 97 किलोमीटरचा उजवा कालवा असे दोन कालवे या धरणावर बांधण्यात आले आहेत. उजव्या कालव्याचे काम अजून पूर्ण झाले नाही. धरणाच्या मंजुरूनंतर तब्बल 52 वर्षांनी या कालव्यातून पाणी वाहू लागल्याने शेतकरी आनंदात आहेत. दोन्ही कालव्याच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर,अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहता, श्रीरामपूर, कोपरगाव या तालुक्यातील शेतजमीन ओलिताखाली येणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील या पाच तालुक्यांतील जवळपास 176 गावांतील 66 हजार 266 हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार आहे.

86 लाख शेतकर्‍यांना खात्यात पहिला हप्ता जमा – नमो किसान महासन्मान योजनेचा पहिला हप्ता आज शेतकर्‍यांच्या खात्यात वितरित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिमोटचे बटण दाबताच राज्यातील 86 लाख शेतकर्‍यांच्या खात्यात प्रत्येकी 2 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही राज्यात नमो किसान महासन्मान निधी योजना सुरुवात केली आहे. या योजनेचा लाभ मिळावा म्हणून राज्यातील सुमारे 1 कोटी 19 लाख शेतकर्‍यांनी नोंदणी केली होती. या योजनेसाठी 95 लाख शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी 86 लाख 40 हजार शेतकर्‍यांच्या खात्यात आज प्रत्येकी 2 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. यासाठी कृषी विभागाने 1720 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला आहे.

COMMENTS