Homeताज्या बातम्यादेश

काँग्रेसला आपल्याच नेत्यांची गॅरंटी नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँगे्रसवर हल्लाबोल

नवी दिल्ली ः ज्या काँगे्रसने कधीही सर्वसामान्य प्रवर्गातील गरिबांना आरक्षण दिले नाही, ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कधीही भारतरत्न दिला नाही,

घराणेशाहीमुळे काँग्रेसचे दुकान बंद होण्याची वेळ
रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हिरवा झेंडा
वर्ल्ड कपचा अंतिम सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादला जाणार

नवी दिल्ली ः ज्या काँगे्रसने कधीही सर्वसामान्य प्रवर्गातील गरिबांना आरक्षण दिले नाही, ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कधीही भारतरत्न दिला नाही, ज्यांनी देशातील रस्त्यांना आणि चौकाचौकांना आपल्याच कुटुंबाची नावे दिली, तेच आपल्याला सामाजिक न्यायावर भाषण देत आहे. ज्या काँग्रेसला आपल्या नेत्याची गॅरेंटी नाही, आपल्या धोरणाची गॅरेंटी नाही. ते मोदींच्या गॅरेंटीवर प्रश्‍न उपस्थित करत असल्याचा जोरदार हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केला. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावाला उत्तर देतांना ते बोलत होते.

यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मल्लिकर्जुन खरगे यांनी आम्हाला 400 जागांचा आशीर्वाद दिला आहे. मी प्रार्थना करतो की, त्यांच्या 40 जागा वाचतील. 10 वर्षांत काँग्रेसने देशाला 11 व्या क्रमांकावर आणले आहे. आम्ही 10 वर्षांत पाचव्या क्रमांकावर आणले. जुन्या सभागृहात देशाच्या पंतप्रधानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला. तुम्ही माझा आवाज दाबू शकत नाही. या आवाजाला देशातील जनतेने बळ दिले आहे. यावेळी मी पूर्ण तयारीनिशी आलो आहे असे मोदींनी म्हटले आहे. काँग्रेसने सत्तेच्या लालसेपोटी लोकशाहीची गळचेपी केली. काँग्रेसने लोकशाही पद्धतीने आलेली सरकारे बरखास्त केली. काँग्रेसने देशाचे संविधान, मर्यादा पाळणार्‍या लोकांना गजाआड केले. काँग्रेसने वृत्तपत्रांचा गळा घोटला. काँग्रेसने देश तोडण्याचे नॅरेटिव्ह रचत गेला. आता उत्तर आणि दक्षिण तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आता हा काँग्रेस पक्ष लोकशाही शिकवतोय, प्रवचने देत आहे. ज्या काँग्रेसने जात, पात आणि भाषा यांच्या नावे देश तोडला. दहशतवाद आणि फुटीरतावादाला जन्म घालणारे हेच लोक आहेत. देशाला ज्यांनी पिछाडीवर नेले तो काँग्रेस आहे. काँग्रेस काळात नक्षलवाद मोठे आव्हान झाला. देशाची मोठी जमीन शत्रूच्या हाती सोपवली. आज ते आम्हाला राष्ट्रीय सुरक्षा आणि अंतर्गत सुरक्षा यावर भाषणे देतो आहे? असा सवाल यावेळी पंतप्रधान मोदींनी काँगे्रसला केला.

आमच्या सरकारची तिसरी टर्म दूर नाही – आमच्या सरकारची तिसरी टर्म दूर नाही. येत्या 5 वर्षांत भारतात डॉक्टर आणि वैद्यकीय महाविद्यालये वाढतील. उपचार स्वस्त आणि सुलभ असतील. प्रत्येक गरीब घरात नळ कनेक्शन असेल. गरिबांना पंतप्रधान निवासस्थान दिले जाईल. एकही वंचित राहणार नाही. सौरऊर्जेमुळे वीज बिल शून्य होणार आहे. देशातील कोट्यवधी जनतेला फायदा होईल. तुम्ही तुमच्या घरी वीज निर्माण आणि विक्री करण्यास सक्षम असाल, अशी ग्वाही यावेळी पंतप्रधान मोदींनी दिली.

COMMENTS