Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इंग्रजी शिक्षणामुळे प्रवरेची जागतिक स्तरावर ओळख

अ‍ॅड. आप्पासाहेब दिघे पाटील यांचे प्रतिपादन

सात्रळ ः अव्वल ब्रिटिश राजवटीत पद्मश्रींनी सहकार, कृषी, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अमुलाग्र विकास कार्य उभे केले. ग्रामीण भागाचे परिवर्तन शि

जागतिक आरोग्य दिनानिमित्त भव्य वॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन
पोलिसानं सास-यावर गोळ्या झाडून केली हत्या l DAINIK LOKMNTHAN —————
पुणतांबा येथे मोफत शिबिरात 880 रुग्णांची नेत्र तपासणी

सात्रळ ः अव्वल ब्रिटिश राजवटीत पद्मश्रींनी सहकार, कृषी, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अमुलाग्र विकास कार्य उभे केले. ग्रामीण भागाचे परिवर्तन शिक्षणामुळेच घडू शकते हे ओळखून पद्मश्रींनी ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू केल्या. प्रवरा शैक्षणिक संकुलात शिकलेले माजी विद्यार्थी आज देश-विदेशात मोठ्या पदावर कार्यरत आहेत. इंग्रजी माध्यमातील शिक्षणामुळे प्रवरेची जागतिक स्तरावर ओळख निर्माण झाल्याचे मत प्रतिपादन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य  अ‍ॅड. आप्पासाहेब दिघे पाटील यांनी केले.

          सात्रळ (ता. राहुरी) येथील लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा 44 वा. पुण्यतिथी समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य  सुभाष  अंत्रे  श्री. बाळासाहेब  दिघे, दिलीप डुक्रे, रंगनाथ दिघे जयवंत जोर्वेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रभाकर डोंगरे, उपप्राचार्य  डॉ. दिपक घोलप,  डॉ. एकनाथ निर्मळ आदी उपस्थित होते. प्रास्ताविक करताना डॉ.प्रभाकर डोंगरे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व कालखंडात पद्मश्रींनी अहिंसात्मक मार्गाने सामाजिक कार्य केले. सहकाराच्या माध्यमातून तळागाळातील लोकांमध्ये जगण्याविषयीचा आत्मविश्‍वास निर्माण केला. शेतकर्‍यांना सावकाराच्या जाचातून मुक्त केले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना मराठी विभागप्रमुख आणि कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. नवनाथ शिंदे यांनी संत एकनाथांच्या अभंगाचा संदर्भ देत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे मौलिक समाज उद्धाराचे कार्य सोदाहरण सांगितले. ’श्री विठ्ठलाचे नाम मंगल’ या अभंगाचा अर्थ सांगत, त्यांनी सहकार पंढरीचे आराध्य दैवत श्री विठ्ठल यांची महती रसाळ भाषेत कथन केली. आभार  डॉ. गंगाराम वडीतके यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. दीप्ती आगरकर यांनी केले.

COMMENTS